Beed Police Big Decision : 'निर्भय' बीडसाठी पोलिस अधीक्षक काँवत यांचा मोठा निर्णय; 'ही' नवीन यंत्रणा ठरणार गुन्हेगारांसाठी 'कर्दनकाळ'

Beed Crime News : वाढत्या गुन्हेगारी घटनांनी हादरत असलेल्या बीड जिल्ह्यातील नागरिकांमधील आणि पोलिस यंत्रणेतील अंतर कमी व्हावं, या उद्देशानं पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक नवी यंत्रणा तयार केली आहे.
Beed Police  .jpg
Beed Police .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर तत्कालीन बीडच्या एसपींची बदली करुन नवनीत काँवत यांना तिथे धाडण्यात आलं होतं. त्यांनी अधिक्षक पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकण्यात मोठं योगदान दिलं. तसेच बीड (Beed) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांत पोलिस दलात मोठे बदल केले आहेत. आता त्यांनी शुक्रवारी (ता.7) आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

बीडचे पोलीस (Police) अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आता कठोर पावले उचलली आहेत. त्यांनी गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक निर्माण करण्यासाठी शुक्रवारी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावलं होतं. यावेळी अधिक्षक काँवत यांनी त्यांनी त्यांची चौकशी तर केलीच आणि शिवाय त्यांना गुन्हेगारी कृत्यांपासून चार हात लांब राहण्याची तंबीही दिली. आता त्यांनी पुन्हा एकदा 'नि्र्भय' बीडसाठी नवीन यंत्रणा अंमलात आणली आहे. जी जिल्ह्यातील गुन्हेगारांसाठी 'कर्दनकाळ'ठरण्याची शक्यता आहे.

वाढत्या गुन्हेगारी घटनांनी हादरत असलेल्या बीड जिल्ह्यातील नागरिकांमधील आणि पोलिस यंत्रणेतील अंतर कमी व्हावं, या उद्देशानं पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक QR Code यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेद्वारे नागरिकांना थेट पोलिसांत थेट तक्रार देखील करता येणार आहे.

Beed Police  .jpg
Ajit Pawar : "मुलाला निवडून आणता आलं नाही अन् आम्हाला...", अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

बीडचे अधिक्षक नवनीत काँवत यांनी सुरु केलेल्या क्यू. आर. कोड च्या यंत्रणेद्वारे पोलीस ठाण्यातील विविध माहिती नागरिकांपर्यंत पोहचणार आहे.तसेच नागरिकांसाठी हा QR Code पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्यासह पोलीस ठाणे अंमलदार यांच्या कक्षात लावला जाणार आहे.नागरिकांना त्यांच्या मोबाईलद्वारे हा QR Code स्कॅन केल्यानंतर त्यांना अपेक्षित असलेली तक्रार किंवा अडचणी नोंदवता येणार आहे.

या कोडद्वारे एखाद्या नागरिकाला अवैध धंदे किंवा इतर गुन्ह्यांविषयी किंवा एखाद्या गुन्हेगारांविषयीची महत्वपूर्ण माहिती देता येणार आहे. संबंधित व्यक्तींचे नाव व मोबाईल क्रमांक पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

Beed Police  .jpg
BJP Leader Statement : ...तर शरद पवारांनाही भाजपकडून अभिनंदनाचे पत्र जाईल; माजी खासदाराचे मोठे विधान

या QR Code हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरीकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या नागरिकास अवैध धंदे किंवा इतर महत्वाची गोपनीय माहिती द्यायची असेल तर ते सदरचा QR Code स्कॅन करुन माहिती देऊ शकतात. अशा व्यक्तींचे नाव व मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवले जाईल.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत स्वत:या क्यूआर कोडमार्फत दाखल करण्यात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी,प्रतिक्रिया, सूचना यांवर लक्ष असणार आहेत. या यंत्रणेद्वारे नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. एखाद्या तक्रारदार पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधानी नसेल अधीक्षक कार्यालयाकडून 24 तासांच्या आत त्या समस्येचा पाठपुरावा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.पोलिसांच्या कामगिरीचे गुणांकन देखील याच फॉर्मच्या माध्यमातून केले जाणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com