Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत असताना दिसत आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाटयावर आला आहे. शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी यांचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये एक कार्यकर्ता चुकीच्या तिकीट वाटपामुळे फोनवरून जाब विचारताना दिसत आहे. तर त्यानंतर आणखी एक दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये चुकीच्या उमेदवारी वाटपाचा राग धरून शिवसैनिकानी राजन साळवी यांना घेराव घातल्याचे पुढे आले आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारीवरून एकीकडे जोरदार रस्सीखेच सुरु असताना आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाटयावर आला आहे. उमेदवारी वाटपानंतर शिवसेनेत नाराजी व्यक्त केली जात आहे.
निवडणूक काळात शिवसेनेचे (Shivsena) एबी फॉर्म धाराशिवचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांना देत वाटप केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा कार्यकर्ता व राजन साळवी यांच्यातील वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये एक कार्यकर्ता साळवींना जाब विचारताना दिसत आहे.
त्यानंतर आता दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्याला उमेदवारी देण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक होऊन राजन साळवी यांना घेराव घातल्याचे दिसत आहे. त्यासोबतच यावेळी त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकाच्या हाती झाडू व सतरंजी देण्याची मागणी केली आहे.
पालकमंत्री सरनाईक काय भूमिका घेणार?
रविवारी दिवसभरात धाराशिव शिवसेनेतील वाद चव्हाटयावर आणणारे दोन व्हिडिओ व्हायरल झाल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच रविवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे धाराशिवमध्ये मुक्कामी येणार असल्याने त्यांच्या समोरच आता या सर्व नाराजी नाट्यावर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे याबाबत पालकमंत्री सरनाईक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.