

Solapur, 23 January : महापालिका निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी माझा पराभव केला, ते आगामी काळात बहुतेक सर्व आमदार झाले आहेत, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक गणेश वानकर यांचे कौतुक केले. हे सांंगताना त्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे उदाहरण दिले.
सोलापूर (Solapur) महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग सहामधून भाजपच्या तिकिटावर गणेश वानकर हे विजयी झाले आहेत. याच प्रभागातून मनोहर सपाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या लढतीत वानकर यांनी सपाटे यांचा पराभव केला. त्याच वानकर यांना सपाटे यांनी पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मनोहर सपाटे (Manohar Sapate) म्हणाले, प्रभाग सहामधील १५ हजार मराठा मतदारांनी मला नाकारून गणेश वानकर यांना मतदान केले आहे, त्यामुळे वानकरांचा भविष्यकाळ उज्वल आहे. मराठा समाज ज्यांच्या पाठीशी उभा राहतो, तो भविष्यात आमदार होतो. आमदार देवेंद्र कोठे यांनी २०१७ मधील निवडणुकीत माझ्या समर्थकांना हाताशी धरून निवडून आले. त्यानंतर ते आमदारही झाले.
आमदार विजयकुमार देशमुख आणि (स्व.) महेश कोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत मराठा समाज देशमुखांच्या पाठीशी राहिला आहे, त्यामुळेच कोठे यांचा पराभव झाला. अन्यथा कोठेंचा पराभव झालाच नसता. विधानसभेच्या २००९ आणि २०१४ मध्येही मला शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी सक्तीने उभे केले होते, असा गौप्यस्फोटही सपाटे यांनी केला.
ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २००९ मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. मात्र, तत्कालीन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी फार्म पळविला, त्यामुळे ती निवडणूक मला अपक्ष लढवावी लागली. मात्र, पक्षाने आदेश देताच माघारही घेतली होती. आमदारकी ही माझ्या नशीबात नाही, पक्षाचे तिकिट आणि एबी फॉर्म मिळविण्यात मी अपयशी ठरतो
कठोर कष्ट, नैतिकता आणि निष्ठेला महत्व नाही, हे ५० वर्षांच्या राजकारणानंतर लक्षात आले. यापुढील काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत कायम करणार आहे, असेही सपाटे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.