Tanaji Sawant & Rahul Mote Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये सावंत विरुद्ध मोटे वाद पुन्हा उफाळला; समर्थक भिडले, जोरदार दगडफेक; 10 ते 12 गाड्या फोडल्या

Dharashiv Politics: धाराशिव जिल्ह्यातील तेरखडा गावात तणावपूर्ण शांतता असून बंदुकधारी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तेरखेडा येथे रात्री उशिरा दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. या घटनेत इनोव्हा, थार, फॉर्च्युनरसह 10 ते 12 वाहनांचे नुकसान झाले.

Deepak Kulkarni

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल मोटे यांच्यात पुन्हा एकदा खटके उडाले आहेत. महायुतीत असूनही या दोन्हीही नेत्यांसह त्यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकी होत असतात. याचदरम्यान, सावंत विरुद्ध मोटे समर्थक पुन्हा एकदा आमने सामने आल्यामुळे धाराशिवचं राजकीय वातावरण तापलं आहे.

भूम परंडा विधानसभा मतदारसंघाच्या 2024 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंचा पराभव करुनच आमदार झाले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये तेरखेडा येथील जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणावरून तुफान राडा झाल्याचं समोर आलं आहे. .

आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या या संघर्षात इनोव्हा, थार, फॉर्च्युनरसह तब्बल 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील 45 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून या तोडफोड आणि राड्याप्रकरणी दोन्ही गटांतील आरोपींचा शोध सुरू आहे.

धाराशिव जिल्ह्यातील तेरखडा गावात तणावपूर्ण शांतता असून बंदुकधारी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तेरखेडा येथे रात्री उशिरा दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. या घटनेत इनोव्हा, थार, फॉर्च्युनरसह 10 ते 12 वाहनांचे नुकसान झाले.

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत समर्थक जिल्ह्याच्या राजकारणात आक्रमक झाला आहे. त्यांच्याकडून झेडपीतील विजयानंतर सावंत यांच्या गटाच्या उन्मादातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

दुसरीकडे, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभव प्रस्थापितांच्या जिव्हारी लागल्याने आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. तसेच राहुल मोटे यांच्या सांगण्यावरूनच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप सावंत गटाने केला आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्याच वाहनांची तोडफोड करून आमच्यावर आरोप केल्याचा दावाही सावंत गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल न केल्याने पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला असून 45 जणांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT