Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Politics : ठाकरेंना मोठा धक्का; बड्या नेत्यासह पदाधिकारी अन् समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Uddhav Thackeray Political setback in Dharashiv : धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील १० नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीदेखील ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.

Aslam Shanedivan

Shivsena UBT Political Setback In Dharashiv News : एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं, यावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच धाराशिवमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी १० नगरसेवकांनी साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच ठाकरेंच्या बड्या नेत्याने आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि समर्थकांसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत 'धनुष्यबाण' हाती घेतला आहे. यामुळे आता ठाकरेंना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली असून, धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे.

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा बडा नेता फोडला. उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे यांनी शनिवारी (ता. २२) आपल्या पदाचा राजीनामा देत आपल्या पदाधिकारी आणि समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

काहीच दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेत घेऊन मोठा धक्का दिला होता. यानंतर आता दुसरा सर्वात मोठा धक्का शिंदेंनी ठाकरेंना दिला आहे. थरूड जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकाच वेळी शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे आता भूम तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून, ठाकरेसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात एकाच वेळी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती पक्षासाठी चिंतेची बाब होत चालली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT