Shivsena UBT Political Setback : तळकोकणात ठाकरेंना मोठा धक्का, विश्वासू शिलेदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray Political Setback in Sindhudurg : तळकोकणात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून बड्या नेत्याने शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Sindhudurg Political News : तळकोकणात मोठी राजकीय घडामोड झाली असून माजी खासदार विनायकराव राऊत यांचे विश्वासू शिलेदाराने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. कणकवलीचे माजी तालुकाप्रमुख सचिन सावंत यांनी ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. नितेश राणेंनी माजी खासदार राऊत यांचा विश्वासू शिलेदारच फोडल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं, यावरून दिल्लीत सुनावणी सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं असून, आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांचं म्हणणं मांडलं जाणार आहे. या सुनावणीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना दोन दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये भाजपने ठाकरेंना मोठा धक्का दिला.

शिवसेनेच्या १० नगरसेवकांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने कळंब नगरपालिकेतील शिवसेनेच्या या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे ठाकरेंपेक्षाही मोठा धक्का खासदार ओमराजे निंबाळकर यांना बसल्याचे मानले जात आहे. तर निंबाळकर यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपने खिंडार पाडल्याचे बोलले जात आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Setback : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीसह, सरपंच, कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत!

या प्रवेशाची राज्यभर चर्चा रंगली असतानाच दुसऱ्याच दिवशी (ता. २१) ठाकरेंना तळकोकणातील सिंधुदुर्गात मोठा धक्का बसला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुभाष देसाई कणकवलीत दौऱ्यावर येण्याच्या आधीच सचिन सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील 'ओम गणेश' निवासस्थानी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावंत यांनी गेली २४ वर्षे शिवसेनेत राहून कणकवली विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांची सुरुवात उपजिल्हाप्रमुख म्हणून झाली असून, माजी खासदार विनायकराव राऊत यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांची ओळख होती.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Setback : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, तब्बल 12 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गळाला? 5 कोटी...

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व आले असून, नितेश राणे यांनी सावंत यांच्या प्रवेशाने भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी चांगला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. सावंत यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला राजकीय धक्का बसल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sindhudurg Land Row; Nitesh Rane And Sanjay Raut
Top-10-News 2
BJP
BJP
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com