Omraje Nimablkar, Rana Patil News Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv News : धाराशिव 'झेडपी'त कमळ, शिवसेनेच्या मदतीनं युतीचा झेंडा फडकणार! राणा पाटलांची सरशी, ओमराजेंनीही दाखवला दम

RanajagjitSinha Patil And Om RajeNimbalkar : धाराशिव तालुक्यासह तुळजापूर तालुक्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वर्चस्व कायम राखले. आहे. या दोन तालुक्यांनी भाजपला मोठा आधार दिला. या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्यूरो

अविनाश पोफळे

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन घडवून आणण्यात भाजपला यश आले आहे. सर्वाधिक 19 जागा जिंकल्यानंतर आता मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेत भाजप जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकवण्यास सज्ज झाला आहे. विकासाच्या मुद्द्यावर आणि स्थानिक अस्मितेवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीत मतदारांनी अनेक ठिकाणी 'बदला'चा कौल दिला आहे. सर्व 55 जागांचे निकाल जाहीर झाले असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

जिल्ह्यातील 8 पैकी 5 तालुक्यांत महायुतीने स्पष्ट वर्चस्व राखले आहे. तर 3 तालुक्यांत महाविकास आघाडीने आपला गड राखण्यात यश मिळवले आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनेक तरुण उमेदवारांनी विजय मिळवित 'जायंट किलर' ठरण्याचा मान मिळवला.

या निवडणुकीत ग्रामीण भागातील महिला मतदारांच्या वाढत्या मतदानाचा टक्का हा निकाल फिरवण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसून येते. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणार्‍यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

राणा पाटलांनी ताकद दाखवली

धाराशिव तालुक्यासह तुळजापूर तालुक्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वर्चस्व कायम राखले. आहे. या दोन तालुक्यांनी भाजपला मोठा आधार दिला. या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. तिकडे भूम-परंडा-वाशी तालुक्यात आमदार तानाजी सावंत यांनी कुटुंबांतर्गत बंडखोरीला तोंड देत आपला दबदबा कायम ठेवला. तर उमरगा तालुक्याने संमिश्र निकाल दिला आहे.

साहेबांच्या राष्ट्रवादीला भोपळा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जिल्हा परिषद गटात एकाही जागा जिंकता आलेली नाही. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ गट व गणातून खाते उघडले आहे. 2017 मधील निवडणुकीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते.

मात्र, त्यानंतर बदललेली राजकीय गणिते, राणाजगजितसिंह पाटील व बसवराज पाटील यांचा भाजप प्रवेश, तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात झालेली फूट यामुळे यंदा भाजपने सर्वाधिक जागा मिळवत वर्चस्व मिळविले आहे. शिवसेनेनेही मुसंडी मारली आहे. मतविभाजनाचा फायदाही भाजप, शिवसेनेला झाल्याचे दिसून येते

पक्षीय बलाबल

भाजप-19

शिवसेना-15

शिवसेना (युबीटी)-7

राष्ट्रवादी काँग्रेस-6

काँग्रेस-3

समाजवादी पक्ष-1

इतर, अपक्ष-4

एकूण-55

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT