Sangli Khanapur ZP: आमदारकीची पहिलीच टर्म, त्यात फडणवीसांचा एकेरी उल्लेख; शिंदेंच्या पठ्ठ्यानं भाजपचा धुव्वा उडवत मारलं मैदान

Shivsena MLA Suhas Babar : शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांची पहिलीच टर्म असल्यानं आणि त्यात त्यांनी महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपलाच डिवचल्यामुळे ते राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते.
Devendra Fadnavis, gopichand padalkar suhas babar And Eknath Shinde
Devendra Fadnavis, gopichand padalkar suhas babar And Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Sangli News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारावेळी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देणारा वक्तव्य केलं होतं. आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून ते मुख्यमंत्री आहेत, असं ते म्हणाले होते. इतकंच नव्हे तर भाजपसह सगळे पक्ष आपण चालवतो, असं विधानही आमदार सुहास बाबरांनी करत भाजपलाच आव्हान दिलं होतं. या त्यांच्या विधानामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पण आता समोर आलेल्या निकालानुसार शिवसेना आमदार सुहास बाबरांनी भाजपचा धुव्वा उडवल्याचं दिसून येत आहे.

शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांची पहिलीच टर्म असल्यानं आणि त्यात त्यांनी महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपलाच डिवचल्यामुळे ते राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते. आता यांनी आपला खानापूर गड राखला आहे. सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं भाजपला पराभवाचा धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या खानापुरातल्या जिल्हा परिषदेच्या चार जागा आणि पंचायत समितीच्या आठ जागांवर शिवसेनेनं विजय खेचून आणला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला भोपळाही फोडता आला नसल्याचं निकालातून दिसून येत आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालात शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं. तसेच आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी आणि शिवसेनेच्या उमेदवार डॉ. शीतल बाबर यांनीही नागेवाडी जिल्हा परिषद गटातून विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात आता लागलेल्या झेडपीच्या निवडणूक निकालातही सुहास बाबर हेच यांचाच करिष्मा चालल्याचं समोर येत आहे.

Devendra Fadnavis, gopichand padalkar suhas babar And Eknath Shinde
Kolhapur ZP Election: 'झेडपी'च्या निकालानंतर राजकीय वारं फिरलं, सतेज पाटील 'दोस्त' मुश्रीफांसोबत जाणार? नेमकं काय म्हणाले..?

विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख केलेल्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर जोरदार शा‍ब्दिक हल्ला चढवला होता. तुमच्या अंगावर जे आज ब्रँडेड कपडे दिसताहेत ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच! मुख्यमंत्र्यांवर टीका करता तेही एकेरी भाषेत. राजकारणाचा अन् विजयाचा इतका अहंकार तुम्हाला आला का? असा संतप्त सवालही पडळकर यांनी बाबरांना केला होता.

तसेच सात वर्षांपूर्वी राजकारणात आलात ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच. 2019 ला तुम्ही माणसात अन् राजकारणात आला नसतात ना, तर राजकारणात तुम्हाला कोणी ओळखलेही नसते. मुख्यमंत्री तुमच्यामुळे असल्याचे तुम्ही सांगता. सगळे पक्ष मीच चालवतो, असेही तुम्ही म्हणता. इतकी तुमची पात्रता तरी आहे का? अशा शब्दांत पडळकर यांनी बाबर यांना ठणकावलं होतं.

Devendra Fadnavis, gopichand padalkar suhas babar And Eknath Shinde
Pune ZP Election : संग्राम थोपटेंनी गेम फिरवला; दिवंगत अजितदादांनी ZP अध्यक्षपदाचा शब्द दिलेल्या उमेदवारालाच दाखवले आस्मान!

तर मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना आमदार सुहास बाबर यांच्याबाबत बोलताना या सर्व गोष्टींबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या पक्षाचे नेते असल्याने त्यांनीही अशा प्रकारच्या वक्तव्याबाबत बाबर यांना समज द्यावी. सुहास बाबर यांनी तोलून मापून बोलायला हवं. नाहीतर पहिलीच टर्म शेवटची ठरू नये,असंही त्यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com