Pratap Sarnaik News Dharashiv Sarkarnama
मराठवाडा

Shiv Sena internal conflict: धाराशिवमध्ये शिवसेनेचे दोन गट भिडले; पालकमंत्री प्रताप सरनाईकसमोरच जोरदार राडा

Pratap Sarnaik Dharashiv News : महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारीवरून एकीकडे जोरदार रस्सीखेच सुरु असताना आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटयावर आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारीवरून एकीकडे जोरदार रस्सीखेच सुरु असताना आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटयावर आला आहे. प्रजाकसत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक रविवारी सायंकाळी धाराशिव शहरात दाखल होताच त्यांच्यासमोरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन गटात मोठा राडा झाला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेतील वाद चव्हाटयावर आणणारे दोन व्हिडिओ रविवारी व्हायरल झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच रविवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवमध्ये मुक्कामी आले आहेत. त्यांच्यासमोरच शिवसनेच्या दोन गटात मोठा राडा झाला. शिवसेनेचे एबी फॉर्म धाराशिवचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी वाटप केले होते. त्यावरून शिवसेनेचा कार्यकर्ता व राजन साळवी यांच्यातील वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. तर लगेचच आणखी एक राजन साळवींना कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचा व्हिडिओ समोर आला. हे दोन व्हिडिओ समोर आल्यानंतर दोन्ही गटात मोठा राडा झाला.

पालकमंत्री सरनाईक यांच्यासमोरच शिवसेनेचे (Shivsena) नेते अजित पिंगळे व अविनाश खोपे हे समोरासमोर आले. या दोघांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी या दोघांमधील वाद मिटवला असला तरी शिवसैनिक संतप्त झाले असल्याने या ठिकाणची परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. यावेळी या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही बाजूच्या शिवसैनिकांना शांत केले. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.

यावेळी या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दुसरीकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या समोरच दोन गट एकेमकांना भिडले. त्यामुळे येत्या काळात या सर्व नाराजी नाट्यावर आता पालकमंत्री सरनाईक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राजन साळवी यांनी भाजप आमदार राणा पाटील यांच्यासोबत गुप्त बैठका केल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला. त्यावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रया व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री म्हणून माझ्या सहमतीने राजन साळवी यांनी हे काम केले आहे. साळवी यांच्यावर जर कोणी आरोप करत असेल तर ते चुकीचे आहे, असे मंत्री सरनाईक यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT