<div class="paragraphs"><p>MlaDhiraj Deshmukh Latur</p></div>

MlaDhiraj Deshmukh Latur

 

Sarkarnama

मराठवाडा

Dhiraj Deshmukh:केंद्राने सोयापेंडवर लावलेली 'स्टॉक लिमिट'राज्यात लागू करू नका

सरकारनामा ब्युरो

लातूर : केंद्र सरकारने सोयापेंडवर लावलेली 'स्टॉक लिमिट' राज्य सरकारने लागू करु नये, अशी मागणी 'लातूर ग्रामीण'चे आमदार धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh)यांनी सभागृहात केली. महाविकास आघाडी सरकार कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. (Latur) या प्रश्नाबाबतही सरकारने शेतकऱ्यांच्या (Marathwada) बाजूने उभे रहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आठवडाभरापूर्वी केंद्र सरकारने सोयापेंडवर 'स्टॉक लिमिट' लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सोयाबीनचे भाव पुन्हा पडणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. या पार्श्वभूमीवर धिरज देशमुख यांनी अधिवेशनात या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

धिरज देशमुख म्हणाले, मराठवाड्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन होते. पण, यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. अशा अडचणीच्या काळात केंद्र सरकारने सोयापेंडवर 'स्टॉक लिमिट' लावण्याचा जाचक निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले.

म्हणून सोयापेंडच्या 'स्टॉक लिमिट'ची राज्यात अंमलबजावणी करू नका. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने अशीच 'स्टॉक लिमिट' लावली होती. त्यावेळी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने ती आपापल्या राज्यांत लागू केली नव्हती. त्यामुळे त्यावेळी बाजारात सोयाबीनचे भाव टिकून राहिले आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने 'स्टॉक लिमिट' लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहावे लागेल. जेणेकरून सोयाबीनचे भाव टिकून राहतील आणि हवालदिल झालेल्या, आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला पुन्हा एकदा दिलासा मिळेल, असे आवाहनही देशमुख यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT