रुईकर कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून पाच लाखांची मदत; पालकत्वही स्वीकारले

व्हिडिओ कॉल करून त्यांनी रुईकर कुटुंबीयांचे सांत्वन केले व बाजीराव चव्हाण यांच्या मार्फत पाच लाख रुपयांची रोख मदत केली. (Eknath Shinde)
Eknath Shinde Help Ruikar Family Beed

Eknath Shinde Help Ruikar Family Beed

Sarkarnama

बीड : शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, हे साकडे घालण्यासाठी बीड (Beed) ते तिरुपती पायी निघालेल्या सुमंत रुईकर या कट्टर शिवसैनिकांचा दुर्दैवी अंत झाला. (Uddhav Thackeray) त्यांच्या पश्चात रुईकर कुटुंबाची आबाळ होऊ नये, त्यांना आधार मिळावा यासाठी शिवसेनेने तातडीने रुईकर कुटुंबाची जबादारी स्वीकारल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर बीड जिल्ह्याची संघटनात्मक जबादारी असलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते रुईकर कुटुंबीच भेट घेऊन त्यांना रोख पाच लाखांची मदत देण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा राज्याचे नगरविकामंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील रुईकर कुटुंबियांना आधार देत स्वतःकडून पाच लाखांची मदत पाठवली.

शिवाय व्हिडिओ काॅलद्वारे त्यांनी या कुटुंबांशी संपर्क साधून संपुर्ण कुटुंबाचे पालकत्व आपण स्वीकारत आहोत, लवकरच तुम्हाला पक्के घर देखील देतो, असे आश्वासन देखील दिले. सुमंत रुईकर हे एकनिष्ठ आणि प्रामाणिक शिवसैनिक होते, त्यांच्या कुटुंबामागे शिवसेना भक्कमपणे उभी राहिली आहे.

या कुटुंबाला पक्के घर, मुलांच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी देखील शिवसेनेने स्वीकारली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. डाॅक्टरांच्या सल्याने ते सध्या विश्रांती घेत आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, त्यांना चांगले आरोग्य लाभावे, असे साकडे तिरुपती बालाजीला घालण्यासाठी सुमंत रुईकर आपल्या काही मित्रांसह बीड ते तिरुपती पायी निघाले होते.

दरम्यान, त्यांना ताप आला, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने हाॅस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यापुर्वी देखील रुईकर यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून, बीड ते तिरुपती अशी पायी वारी केली होती. रुईकरांचा मृत्यू हा शिवसेना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला होता.

<div class="paragraphs"><p>Eknath Shinde Help Ruikar Family Beed</p></div>
मराठवाड्यातील ४५ नगर परिषदा व दोन नगर पंचायतीवर प्रशासकाच्या नियुक्त्या!

शिवसैनिकाच्या कुटंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे स्पष्ट करत शिवसेनेने रुईकर कुटुंबाची संपुर्ण जबादारी स्वीकारल्याचे नुकतेच जाहीर केले होते. त्यानूसार रुईकर यांच्या कुटुंबीयाच संपूर्ण पालकत्व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले.

व्हिडिओ कॉल करून त्यांनी रुईकर कुटुंबीयांचे सांत्वन केले व बाजीराव चव्हाण यांच्या मार्फत पाच लाख रुपयांची रोख मदत केली. रुईकर कुटुंबीयांच संपुर्ण पालकत्व स्वीकारल्याबद्दल बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com