Dhnanjay Munde Letter To Education Minister News Sarkarnama
मराठवाडा

Dhnanjay Munde : एक रुपयात पेन्सील तरी मिळते का ? प्रतिदिन अनुदान २० रुपये करा

Marathwada : या योजनेतून अनुदान देण्यासाठी यावर्षी शासनाने निधीही उपलब्ध करून दिलेला नाही.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी माजी सामाजिक न्याय मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी दुर्बल घटकांतील मुलींना दिल्या जाणाऱ्या उपस्थिती भत्याकडे शालेय शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले.

प्रतिदिन १ रुपया इतक्या मिळणाऱ्या भत्त्याचा उल्लेख करत मुंडे यांनी यात प्रतिदिन २० रुपये एवढी वाढ करण्याची मागणी निवदेनाद्वारे केली आहे. धनंजय मुंडे यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Deepak Keserkar) यांना एक पत्र लिहले असून यामध्ये दुर्बल घटकातील मुलींना दिल्या जाणाऱ्या तुटपुंजा उपस्थीती भत्याकडे लक्ष वेधले आहे. (Marathwada)

मुंडे आपल्या पत्रात म्हणतात, १९९२ साली लागू करण्यात आलेल्या या योजनेतून अनुदान देण्यासाठी यावर्षी शासनाने निधीही उपलब्ध करून दिलेला नाही.आजच्या महागाईच्या जमान्यात एक रुपयात एक साधी पेन्सिल तरी मिळते का? सावित्री माईंच्या जयंतीच्या निमित्ताने या योजनेचे पुनरावलोकन करून अनुदान वाढवण्याचा निर्णय शासनाने घ्यावा.

राज्यात पहिली ते चौथीत शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती आदी प्रवर्गातील सावित्रीच्या लेकींना मागील वर्षांपासून दिले जाणारे दैनंदिन १ रुपया अनुदान वाढवून प्रतिदिन किमान २० रुपये करावे ,अशी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT