Minister Dhnanjay Munde
Minister Dhnanjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhnanjay Munde : हात जोडतो, माझ्यावर वार करा पण मायभूमीला बदनाम करु नका

Dattatrya Deshmukh

बीड : दोन पक्ष, दोन विचारधारा असू शकतात. विचारधारेची लढाई विचारधारेने होऊ द्या, तुमच्या राजकीय वैऱ्याला बदनाम करायचेय तर जिल्ह्याचे नाव घेऊन बदनामी करु नका. (Beed) हवे तर माझ्यावर वार करा, पण मायभूमिला बदनाम करु नका, असे भावनिक आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी केले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा व पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांचा कारभार अलिकडे विधिमंडळात मोठ्या प्रमाणावर गाजला. (Marathwada) अगदी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनीही विधानसभेत जिल्ह्याचा बिहार होतोय, असा आरोप केला. यापूर्वी भाजप नेत्यांनीही जिल्ह्यात माफियागीरी सुरु असल्याचा आरोप करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘जिल्ह्यात येऊन पहा काय चाललेय’असे आवाहन केले होते.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. शनिवारी कृषी विभागाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी अगदी हात जोडले आणि जिल्ह्याला बदनाम करु नका, असे कळकळीचे आवाहन केले. अलिकडे राजकीय वैऱ्याला बदनाम करण्यासाठी जिल्ह्याचे नाव घेतले जात असल्याचा आरोप करत जिल्हावासियांनी जिल्ह्याची बदनामी खपवून घेऊ नये, असे आवाहन मुंडे यांनी केले.

आठ दिवसापूर्वी आलेला अधिकारी, ज्याने एकाही फाईलवर स्वाक्षरीही केलेली नसताना जिवाची भीती असल्याचे सांगतो व रिव्हॉल्व्हर मागून बदनामी करतो. जिल्ह्यातील शेतकरी कल्पक व प्रगतशिल आहे. जेव्हा लोक इतर जिल्ह्यात जातील व जिल्ह्यात येऊन पाहतील तेव्हा त्यांना जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक प्रगत असल्याचे दिसेल. याची जबाबदारी शेतकरी बांधवांवर असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT