Dhnanjay Munde On Hail News Sarkarnama
मराठवाडा

Dhnanjay Munde On Hail News : पुन्हा अवकाळी अन् गारपीट, मायबाप सरकार मदत घोषित करा..

Ncp : पुन्हा अवकाळी आणि गारपीट! पुन्हा नुकसान! पंचनामे कुठपर्यंत आलेत सरकार सांगेल का?

सरकारनामा ब्युरो

Marathwada : गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर (Affected Farmers) आणखी एक नवे संकट कोसळले आहे.

आधीच्या नुकसानीचे पंचनामे, मदत रखडली असतांना पुन्हा नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि मदत कधी मिळणार? (Ncp) असा प्रश्न माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी उपस्थितीत केला आहे.

बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी व गारपीटीने झालेल्या नुकसानीचे फोटो ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली आहे. मराठवाड्यात व राज्याच्या काही भागात दोन दिवसांत अवकाळी पावसाने झोडपले आहे.

शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले असे असतांना राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावरून मुख्यमंत्र्यांना फटकारत शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायचे की राजकीय दौऱ्याला असा सवाल केला आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी देखील ट्विट करत मायबाप सरकार मदत घोषित करा, असे आवाहन केले आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी आणि गारपीट! पुन्हा नुकसान! पंचनामे कुठपर्यंत आलेत सरकार सांगेल का? अवकाळी आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ घोषित करा मायबाप सरकार.. अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT