Devendra Fadnavis Statement: शरद पवारांच्या समर्थनार्थ फडणवीस मैदानात;राहुल गांधीवर केला 'हा' गंभीर आरोप,म्हणाले...

BJP Vs Congress : "आज फक्त घाबरलेले, लोभी लोक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान गात आहेत..''
Devendra Fadnavis and Sharad Pawar
Devendra Fadnavis and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. हिंडेनबर्ग संस्थेने जारी केलेल्या अहवालावरुन काँग्रेसनं पंतप्रधान मोदी यांच्यासह अदानी समूहावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र, याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी व हिंडेनबर्ग अहवालाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहे.

तसेच पवारांच्या भूमिकेवर काँग्रेस नेतेमंडळींकडून टीकाही केली जात आहे. तसेच यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी पवारांवर टीका करणार्यांना खडेबोल सुनावले आहे.

Devendra Fadnavis and Sharad Pawar
Government Offices News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ; कार्यालयांच्या वेळा बदलल्या ; आता सकाळी..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी टि्वटद्वारे काँग्रेसच्या राहुल गांधींवर खडेबोल सुनावले आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारं टि्वट केलं आहे. लांबा यांनी ट्विट करत म्हणाल्या, "आज फक्त घाबरलेले, लोभी लोक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान गात आहेत. एकटे राहुल गांधी देशातील जनतेची लढाई लढत आहेत. चोरांपासून भांडवलदार आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराविरुद्ध राहुल गांधी लढत आहेत.''

भारताची प्रगल्भ राजकीय संस्कृती संपविण्याचं काम करताहेत...

देवेंद्र फडणवीस यांनी अलका लांबा यांच्या टि्वटवरुन राहुल गांधीवर आगपाखड केली आहे. फडणवीस म्हणाले, राजकारण आपल्या जागी आहे आणि ते होत राहील.पण जे भारताच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आहेत, दीर्घकाळचे सहयोगी आहेत आणि ज्यांनी 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे, त्यांच्याबद्दल अशी भाषा घातक आहे.राहुल गांधी भारताची प्रगल्भ राजकीय संस्कृती संपविण्याचे काम करीत आहेत असंही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis and Sharad Pawar
MNS News : राष्ट्रवादी भाजपची बी टीम ; अदानी प्रकरणावरुन मनसेचा गंभीर आरोप

शरद पवार काय म्हणाले होते?

हिंडनबर्ग अहवालासंदर्भातही शरद पवारां(Sharad Pawar)नी मोठं विधान केलं आहे. हिंडनबर्ग ही परदेशी कंपनी आहे. या कंपनीचं नाव यापूर्वी कधीही ऐकलेलं नाही. त्यामुळे अशा कंपनीच्या अहवालापेक्षा या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेला अहवाल आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ही आमची भूमिका आहे, याचा विरोधकांच्या एकजुटीवर काहीही परिणाम होणार नाही असंही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

संसदेत संख्याबळ पाहता जेपीसीमध्ये २१ सदस्य असतील तर सत्ताधारी पक्षाचे १५ आणि विरोधी पक्षांचे सहा सदस्य असतील, त्यामुळे समितीवर शंका निर्माण होईल, असे पवार म्हणाले होते. मी जेपीसीच्या विरोधात नाही. जेपीसी अनेक वेळा स्थापन झाल्या आहेत आणि मी काही जेपीसीचा अध्यक्ष आहे. बहुमताच्या आधारावर (संसदेत) ची स्थापना केली जाईल. ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक योग्य आणि प्रभावी ठरेल असे माझे मत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com