औरंगाबाद : `महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे`, असे बॅनर पाहून भाजप आक्रमक झाली आहे. (Bjp) आमच्या आया-बहिणी रस्त्यावर पडल्या आहेत का? असा संतप्त सवाल करत भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी औरंगाबाद (Aurangabad) शहरातील गुलमंडीवर लावलेल्या पोस्टरला काळे फासत ते फाडून टाकले.
शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असलेल्या भागात अशी जाहीररित्या महिलांची अब्रू एक व्यक्ती चव्हाट्यावर मांडतो आणि त्यावर सत्ताधारी मूग गिळून बसतात हा प्रकार संतापजनक असल्याचा आरोप करत भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे आक्षेपाहार्य आणि महिलांचा अपमान करणारे बॅनर लावणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महापालिका निवडणुक लढवता यावी म्हणून आधाची विवाहित आणि तीन आपत्य असलेल्या एका महाशयाने केवळ निवडणूक लढता यावी म्हणून, बायको हवी, असे बॅनर तेही शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गुलमंडीवर लावले. औरंगाबाद शहरातील गुलमंडी हा भाग शहराचे हदयस्थान म्हणून ओळखले जाते.
अनेक राजकीय पक्षांचा केंद्रबिंदू म्हणून देखील गुलमंडीकडे पाहिले जाते. त्यामुळे सदैव वर्दळ असलेल्या या भागात लावलेले `निवडणूक लढण्यासाठी बायको पाहिजे` हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने हे बॅनर लावले होते. कालपासून लागलेल्या या बॅनरकडे आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष गेले.
काही महिला पदाधिकाऱ्यांसह दुपारी भाजपचे कार्यकर्ते गुलमंडीवर दाखल झाले आणि त्यांनी या बॅनरला काळे फासत ते फाडून टाकले. स्वतःला शिवसैनिक, मनसेचा कार्यकर्ता म्हणवणाऱ्या रमेश पाटील यांनी आया-बहिणीची अब्रू वेशीला टांगली असतांना तीन पक्षांचे सरकार, गुलमंडीला आपला बालेकिल्ला म्हणवणारी शिवसेना शांत कशी? असा सवाल देखील यावेळी संतप्त महिला पदाधिकाऱ्यांनी केला.
कालपासून लागलेले हे बॅनर पोलिस, सत्ताधारी राजकीय पक्षांना दिसले नाही का? मग ते गप्प का होते? अशा प्रवृत्तीमुळेच राज्यात महिलांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप करत संबंधित बॅनरबाजी करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील भाजपच्या महिलांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.