Chhatrapati Sambhajinagar Press Sarkarnama
मराठवाडा

CM Ask Raut ? : ‘राऊत आले नाहीत का,?’ ; मुख्यमंत्र्यांचा भर पत्रकार परिषदेत सवाल

Chhatrapati Sambhajinagar Cabinet Meeting : आपण पत्रकार म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले होते.

Vijaykumar Dudhale

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथे आज (ता. १६ सप्टेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४५ हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळाही दिल्लीत बसविण्यात येणार आहे. तसेच रामकृष्ण गोदावरी सिंचन प्रकल्पही मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेवढ्यात ‘राऊत नाही आले का,?’ असा सवाल केला. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकताच विकास राऊत असा त्यांनी पूर्ण उल्लेख केला. ('Didn't Raut come?': chief minister asked in the press conference)

राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आज झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी राऊत यांच्यासंदर्भात सवाल विचारला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि आमदार उपस्थित होते.

खासदार संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी पोलिसांनी परवानगी दिली, तर आपण पत्रकार म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार असल्याचे जाहीर केले होते. पण, पोलिस आपल्याला परवानगी देतील, असे वाटत नसल्याचे त्यांनी शुक्रवारी म्हटले होते.

दरम्यान, आज सकाळी आयुक्तालयातून संजय राऊत यांचा पास नेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्याला वाटेल तर आपण नक्की पत्रकार परिषदेला जाऊ, अशी काहीशी नरमाईची भूमिका खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी घेतली होती. त्यामुळे संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार का, अशी चर्चा रंगली होती. तोच धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी भर पत्रकार परिषदेत राऊत आले नाहीत का, असा सवाल केला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT