Sambhajinagar Cabinet Meeting : मराठवाडा वॉटर ग्रीडचा मुडदा कोणी पाडला; फडणवीसांचा विरोधकांना सवाल

Devendra Fadnavis News : राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदतीच्या पॅकेजवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदतीच्या पॅकेजवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्या टीकेला उत्तर देताना मराठवाडा वॉटर ग्रीडचा मुडदा कोणी पाडला, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. (Who suspended the Marathwada Water Grid; Devendra Fadnavis' question to opposition)

Devendra Fadnavis
Pradip kand News : प्रदीप कंदांचा ‘मास्टर स्ट्रोक’; मर्जीतील तालुकाध्यक्ष नेमून उमेदवारीची दावेदारी केली पक्की!

मंत्रिमंडळाच्या २०१७ मध्ये झालेल्या बैठकीत ४९ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा आमच्या सरकारने केली होती. त्यामध्ये केवळ एक दोन गोष्टी वगळता सर्व निर्णयाची अंमलबाजवणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मधल्या अडीच वर्षांत महविकास आघाडी सरकारने कॊणताच निर्णय पुढे नेला नाही. त्यांनी उलट आमच्या काही योजनेला स्थगिती दिली. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजना होत्या. त्यातील मराठवाडा वॉटर ग्रीडला निधी न देता या योजनेचा मुडदा कोणी पाडला, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी होत असलेली मंत्रीमंडळ बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंचतारांकित हॉटेलमधील मुक्कामावर टीका झाल्याने त्यांना मुक्कामाचे ठिकाण बदलावे लागले आहे. त्यामुळे या दोन दिवसातील घटना व घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Devendra Fadnavis
Sambhaji Raje Announcement : सोलापूर, माढ्यासह लोकसभेच्या ४८ जागा स्वराज्य पक्ष स्वबळावर लढवणार; संभाजीराजेंची घोषणा

दरम्यान, आजच्या बैठकीतून मराठवाडा वॉटर ग्रीडला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेला गती देण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थगिती दिली होती. त्यामुळे या दोन्ही योजनांना पुनरुज्जीवन देऊन मराठवाडयातील दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यासाठी महायुती सरकारकडून मोठे पॅकेज घोषित करण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis
ED New Director : राहुल नवीन असणार ईडीचे नवे संचालक; सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मिश्रांच्या जागी नियुक्ती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com