prajakta Mali Disha Pinki Shaikh Sarkarnama
मराठवाडा

Disha Shaikh : तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या दिशा शेख आमदार धसांवर कडाडल्या; म्हणाल्या,'मणिपूरमधील घटनेइतकीच प्राजक्ता माळी...'

Disha Pinki Shaikh on Suresh Dhas : भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 'त्या' वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख कडाडल्या आहेत.

Rashmi Mane

अविनाश काळे-

Umarga News : कोणत्याही क्षेत्रातील महिलांचा सन्मानच केला पाहिजे, पण सध्या घाणेरड्या राजकारणात महिलांना ओढले जात आहे. विशेषतः सिने क्षेत्रातील अभिनेत्री विषयी बेताल वक्तव्य करण्यात काही जण माहीर झाले आहेत. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा उल्लेख केला होता. त्यांच्याबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरू आहे.

खुद्द प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषदेत धस (Suresh Dhas) यांच्यावर प्रहार केला आहे. अशा स्थितीत तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या व वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख (Disha Pinki Shaikh) यांनी आमदार धस यांचे वक्तव्या संदर्भात खरमरीत टीका केली आहे. 'मणिपूरमध्ये मुलीवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रकारा इतकीच दाहकता धस यांच्या वक्यव्यात दिसून येते असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

देश व राज्यातील लोक दशहतीच्या वातावरणात जगता आहेत. घाणेरड्या राजकारण्यांमुळे लोकशाहीचे अवमुल्यन होण्याचा प्रकार घडतोय. सत्ताधिशांना वठणीवर आणण्यासाठी चांगल्या विरोधकांची गरज आहे. महिलावर अत्याचार होत असताना लोक ही केवळ जीवंत असलेल्या अविर्भावात रहातात, ना उठाव ना जाब विचारण्याची तयारी दिसत नाही. महिलावर बलात्कार करण्याची क्षमता नसलेले पण इच्छा असलेली पुरुषी वाईट प्रवृत्ती वाढत आहे. महिलांनी अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढण्यासाठी मैदानात उतरले पाहिजे. असं वक्तव्य त्यांनी या वेळी केलं आहे.

आमदार धस यांच्या वक्तव्यात दाहकता !

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यात रान उठवले जात आहे, आष्टीचे आमदार सुरेश धस मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टिकास्त्र सोडत आहेत. सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल त्यांनी माध्यमासमोर केलेले वक्तव्य बरोबर नाही, असे सांगून मणिपूरमध्ये मुलीवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रकारा इतकीच त्यांच्या वक्तव्यात दाहकता असल्याची टीका दिशा शेख यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT