Suresh Dhas : "जे काही झालं त्याला मी समोरे जायला तयार", प्राजक्ता माळीच्या तक्रारीवर धस यांची प्रतिक्रिया

Suresh Dhas on Prajakta Mali : प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे
Prajakta Mali Complaint Against Suresh Dhas
Prajakta Mali Complaint Against Suresh Dhas sarkarnama
Published on
Updated on

Pune News : अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांनी परळी पॅटर्न शब्द वापरून केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. तसेच धस यांची महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्राजक्ता माळी यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यावर फडणवीस यांनी त्यांच्या (प्राजक्ता माळी) सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वास्त केले.  

Prajakta Mali Complaint Against Suresh Dhas
Chetan Tupe : मोठी राजकीय घडामोड! अजितदादांच्या आमदारानं घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, ..तर दोन्ही पवार एकत्र येतील!

आपल्या विषयी काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात अशी तक्रारही प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यावेळी केली. त्यावर त्या सर्व लोकांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Prajakta Mali Complaint Against Suresh Dhas
Kolhapur Police News : कोल्हापूर पोलिस ॲक्शन मोडवर! तळीरामांना बसणार चाप!

 प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे केलेली तक्रार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. धस म्हणाले, माझ्यासाठी तो विषय संपला आहे. त्यावर जर प्रश्न विचारणार असाल तर मी बोलणार नाही. जे काही झालं त्याला मी समोरे जायला तयार आहे. माझी बाजू अनेकांनी मंडली आहे. संतोष देशमुख यांची हत्या आणि बीड जिल्ह्याचं झालेले जंगल राज याचा फोकस डिव्हर्ट करू नका असं म्हणत याविषयांवर अधिकच बोलणं सुरेश धस यांनी टाळलं 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com