Dhnanjay Munde, News Beed Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News: परळीत पुन्हा दिवाळी, मुंडेंचे होणार जंगी स्वागत अन् सभा..

NCP Parli News: मुंडे हे त्यांचे आराध्य असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ यांच्या समाधीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : महाविकास आघाडीत सामाजिक न्याय मंत्री राहिलेले धनंजय मुंडे आश्चर्यकारकरित्या पुन्हा मंत्री झाले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्या धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी सरकारमध्येही मंत्रीपदाची लाॅटरी लागली. मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे येत्या गुरुवारी परळीत येणार आहेत.

यापुर्वी महाविकास आघाडीत मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर (Parali) परळीकरांनी दिवाळी साजरी केली होती. आता दुसऱ्यांदा मंत्री होवून मुंडे (Dhananjay Munde) गुरुवारी परळी या आपल्या मतदारसंघात येणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी समर्थकांनी सुरू केली आहे. सायंकाळी भव्य सत्कार व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा परळीकरांना दिवाळीचा अनुभव येणार आहे.

गुरुवारी दुपारी १२ वाजता आष्टी तालुक्यातील कडा येथून राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आष्टी-पाटोदा-शिरूर कासार मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड.राजेश्वर चव्हाण, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर यांच्या पुढाकारातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या स्वागत-सत्काराची जोरदार तयारी केले आहे.

धनंजय मुंडे हे त्यांचे आराध्य असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ यांच्या समाधीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर कुसळंब मार्गे पाटोदा येथे आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजहसिंह बांगर मुंडेंचे अकरा ठिकाणी भव्य स्वागत करणार आहेत.

त्यानंततर बीड, वडवणी, तेलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांची सदिच्छा भेट व सत्कार घेऊन, धारूर, केज अंबाजोगाई मार्गे ते परळीत दाखल होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता नाथ रोडवरील यात्रा मैदानात धनंजय मुंडें यांचा भव्य सत्कार व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT