Balasaheb Thackeray-Sharad Pawar News : बाळासाहेब ठाकरे वडीलधाऱ्या अधिकाराने शरद पवारांना खडसावतात तेव्हा..

Shivsena-Ncp : फक्त महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे.
Balasaheb Thackeray-Sharad Pawar News : बाळासाहेब ठाकरे वडीलधाऱ्या अधिकाराने शरद पवारांना खडसावतात तेव्हा..

Maharashtra : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी ३२ आमदारांसह बंड पुकारात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. (Balasaheb Thackeray-Sharad Pawar News) समर्थक आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांच्या वाढत्या वयाचा उल्लेख करत त्यांनी आता थांबावे, मार्गदर्शन करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

Balasaheb Thackeray-Sharad Pawar News : बाळासाहेब ठाकरे वडीलधाऱ्या अधिकाराने शरद पवारांना खडसावतात तेव्हा..
Maharashtra Cabinet Expansion : 'वर्षा'वर मध्यरात्रीपर्यंत गुप्त बैठक; अजितदादा एक तास उशीरा आले अन् लवकर..

यावरून शरद पवार, (Sharad Pawar) सुप्रिया सुळे व राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील मैत्री आणि त्याच मित्रत्वाच्या नात्याने बाळासाहेबांनी मोठ्या पवारांना सुनावल्याचा उल्लेख असलेले पत्र जाहीर केले आहे.

राजकारणापलिकडची मैत्री हे दोघेही कसे जपत होते, आणि विरोधक असले तरी ते एकमेकांची काळजी, विचारपूस कशी करायचे हे या पत्रातून स्पष्ट होते. (SHIVSENA) आजाराच्या एका मोठ्या संकटातून सुखरूप बरे झाल्यानंतर बाळासाहेबांनी हे पत्र १५ फेब्रुवारी २००६ रोजी शरद पवार केंद्रात कृषी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री असतांना पाठवले होते. (NCP) या पत्रातील मजकूर वाचकांसाठी जसाच्या तसा..

`आदरणीय शरदचंद्रजी पवार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, हिंदूस्थान सरकार, नवी दिल्ली. प्रिय शरदबाबू यांसी जय महाराष्ट्र ! आपण केंद्रात कृषीमंत्री या पदावर विराजमान झालात आहात. तरीपण हे पद बाजूला सारून आपल्याला मी माझे जुने मित्र शरदबाबू या नावानेच विचारणार आणि बोलणार. आपण बरे झालात हे ऐकून बरे वाटले ; परंतु वडीलधाऱ्या अधिकाराने आम्ही आपल्याला आदेश देत आहोत की, यापुढे जरा वणवण कमी करा, झेपेल तेवढे जरूर करा.

पण अलिकडे आपला दौऱ्यावर जाण्याचा सुकाळ झाला होता. वाकड्यातिकड्या मार्गाने आपण दौरे करीत होता. परदेश दौऱ्यातही कोठे कमतरता नव्हती. आपल्या पक्षाची निशाणी जरी घड्याळ असली तरी आणि त्या घड्याळाचे काटे जरी स्थिरावले असले तरी आपल्या आयुष्याचे घड्याळ टिक टिक करीत त्याचे काटे पुढे सरकतच असतात हे विसरू नये. सोनियाच्या `कथली` राजवटीत आपण अन्न व शेती मंत्री आहात.

Balasaheb Thackeray-Sharad Pawar News : बाळासाहेब ठाकरे वडीलधाऱ्या अधिकाराने शरद पवारांना खडसावतात तेव्हा..
Sharad Pawar News : पक्षवाढीसाठी स्वतः शरद पवारांनी घातले लक्ष!

सध्याच्या परिस्थितीत आपण हे महत्वाचे खाते सांभाळीत आहात. त्यामुळे फक्त महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे. परंतु देशाची भयानक अवस्था पाहिल्यावर आपल्यासारख्याची देशाला नितांत गरज आहे. त्यामुळे स्वतःसाठी नसले तरी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी तुम्हाला जगावेच लागेल. त्याप्रमाणे वागणूक ठेवावी व प्रकृतीची काळजी घ्यावी`. कळावे, आपला बाळ ठाकरे.

ताजा कलम : आपण घरी आल्यावर हितचिंतकांच्या झुंडीच्या झुडी आपल्या दारावर आदळतील त्यांना आवर घालावा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com