Shivsena Mla Dnyanraj Chaugule
Shivsena Mla Dnyanraj Chaugule Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad : ज्ञानराज चौगुले बोलले.. म्हणाले, मतदारसंघाच्या विकाससाठीच बंड

अविनाश काळे

उमरगा : उस्मानाबाद जिह्यातील उमरगा - लोहारा मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आठ दिवसानंतर बंडाच्या अनुषंगाने ऑनलाईन संवाद साधत प्रतिक्रिया दिली. (Osmanabad) कुणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतःच्या विचाराने येथे आलो आहे. मतदारसंघाच्या विकासासाठीही येथे आल्याचे ते सांगत आहेत. (Marathwada)

दरम्यान "राजकिय गुरू प्रा. रविंद्र गायकवाड, गटनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने येथे आलोय" हे वाक्य मतदार संघातील नागरिक, शिवसैनिकांना बुचकाळ्यात टाकणारे असल्याने या वाक्याची वेगवेगळ्या अर्थाने चर्चा केली जात आहे. (Shivsena) उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघातुन (अनुसूचित जाती राखीव) आमदार चौगुले तीन टर्म निवडून आले आहेत.

मतदारसंघात त्यांच्या विषयी नेहमी सहानभूती राहिलेली आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडात ते सामील झाल्याची घटना तमाम मतदारांना विशेषतः शिवसैनिकांना धक्का देणारी होती. चौगुलेंसारख्या संयमी आणि निष्ठावंत शिवसैनिकाकडुन हे शक्यच नाही अशीच अनेकांची भावना होती. मात्र त्यांच्या "शिंदे निष्ठा" ला पुष्टी देणाऱ्या अनेक वृत्त, घटना समोर आल्याने बंडावर शिक्कामोर्तब झाले.

त्यानंतर मात्र शिवसैनिकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. शिवसेना नगरसेवक ते आमदार या राजकिय प्रवासात चौगुलेंचे कौशल्य, निष्ठा महत्वाची ठरलेली असली तरी खरी दिशा माजी खासदार प्रा. गायकवाड यांच्यामुळे मिळाली आहे. बंडानंतर प्रथमच आमदार चौगुले यांनी बुधवारी संवाद साधला.

त्यात त्यांनी ३० वर्षाच्या काळात शिवसेनेची भगवा पताका घेऊन वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे आल्याचे म्हटले आहे. संवादात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख आला नाही मात्र राजकिय गुरु प्रा. रविंद्र गायकवाड, गटनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आलोय. असा उल्लेख आला आहे.

वास्तविकत : प्रा. गायकवाड यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहिर केलेले आहे. मात्र चौगुलेंच्या वाक्याने संभ्रम निर्माण झालेला आहे, प्रा. गायकवाड यांच्यामुळे आत्तापर्यंतचा राजकिय प्रवास झालेला आहे असे त्यांना म्हणायचे होते की, जाणीवपूर्वक बोलायचे होते. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान आमदार चौगुलें यांनी शेवटी कुणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतःच्या विचाराने आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आल्याची माहिती दिली आहे. एकंदरीतच राज्यातील राजकिय घडामोडी घडताहेत, त्यात बंडखोर आमदाराच्या मतदारसंघातही घडताहेत. चौगुलेंच्या कांही नेहमीच्या विरोधक शिवसैनिकांनी नुकताच निषेध केला. मात्र मतदारसंघातील असंख्य शिवसैनिकांची भूमिका मात्र अद्यापहि गुलदस्त्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT