Ashok Jagdale  Sarkaarnama
मराठवाडा

Ashok Jagdale : तुळजापूरचं भलं करा, मी पठ्ठ्या आमदारकीचा नाद सोडतो; अशोक जगदाळेंचे ओपन चॅलेंज

सरकारनामा ब्यूरो

Tuljapur News : तुळजापूर मतदारसंघातील फोडाफोडीच्या राजकारणानंतर तीन वेळा आमदारकीची संधी हुकलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे यांनी पुन्हा एकदा आमदारकीचा चंग बांधला आहे. मात्र, कुठून लढायचे अन् कोणाची साथ मिळणार याचे कोडे काही त्यांना सुटलेले नाही. अशातच त्यांनी तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील व माजी आमदार मधूकर चव्हाण यांना भलतीच अट घालून चक्रावून टाकले आहे. तुळजापूरचे भले करणार असाल तर आमदारकीचा नाद सोडतो, असे ओपन चॅलेंज देत पाटील, चव्हाण यांना अडगळीत टाकले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधीच येथील वातावरण चांगलेच तापले आहे.

नळदुर्ग शहर व परिसरातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी त्यासोबतच येत्या काळात नळदुर्ग तालुक्याची निर्मिंती करणार असेल तर सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून माजी आमदार मधुकर चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. याबाबत तयांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

त्यासोबतच नळदुर्ग शहरातील व तुळजापूर तालुक्यातील अनेक विकास कामे अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. आजपर्यंत हे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे विकास रखडला आहे. तालुक्यात एकही मोठा उद्योगधंदा नाही त्यामुळे युवकाच्या रॊजगाराचा प्रश्न गंभीर आहे. बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधीनी हा प्रश्न सोडवलेला नाही, असा सवालही जगदाळे यांनी उपस्थित केला आहे.

२५ वर्ष सत्तेत असताना नळदुर्ग शहराच्या विकासासाठी कोणी काय प्रयत्न केले ते सांगावे असे खुले आवाहनही याप्रसंगी त्यांनी दिले. नळदुर्ग तालुक्याची निर्मिंती, औद्योगिक वसाहत निर्माण करणे, अप्पर तहसील कार्यालय करणे, स्वतंत्र कृषी बाजार समितीची निर्मिती केलेली नाही. केवळ हे प्रश्न सुटले नाहीत म्हणून शहराचा विकास झाला नसल्याचा आरोप तयांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. पदमसिंह पाटील हे देखील मंत्री होते. मात्र त्यांनी देखील नळदुर्ग तालुक्याची निर्मिंतीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या प्रश्नांकडे लक्ष देत तुळजापूर तालुक्याचा विकास करणार असाल तर आमदारकीचा नाद सोडून देतो, असे सांगत त्यांनी त्यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील (ranajagjitsinh patil) व माजी आमदार मधूकर चव्हाण (madhukar chvahan) या दोन्ही नेत्यांना कोड्यात टाकले आहे.

SCROLL FOR NEXT