Uddhav Thackeray : 'बाळासाहेबां'च्या तालमीतला निष्ठावंत शिवसैनिक संकटांनी घेरलेल्या उद्धवांना उभारी देणार

Shivsena Political News : ठाकरेंनी सध्या तरी टाॅप गिअर टाकत शिवसैनिकांमध्ये हुंकार भरण्याचं काम सुरू केले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

संजय परब-

Mumbai News : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. 40 आमदार आणि तब्बल 13 खासदारांनी साथ सोडल्यानंतर एकटे पडलेले ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. बंडानंतर काहीसे बॅकफूटवर गेलेले ठाकरे आता पुन्हा फाॅर्मात आल्याचे चित्र आहे. त्यांनी बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाकरेंनी विदर्भ, खानदेश, मराठवाड्यानंतर, उत्तर महाराष्ट्रानंतर आता आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आहे.

बाळासाहेबांचा 'ठाकरेबाणा' सोबतीला घेत ठाकरेंनी आपल्या सभांमधून भाजपासह शिंदे गटावर अक्षरश: तुटून पडत आहेत. बंडानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हंही शिंदे गटाला मिळाले आहेत. त्यामुळे चोहोबाजूंनी संकटांच्या फेऱ्यात सापडलेल्या उद्धव यांना बाळासाहेबांच्या फळीतला शिवसैनिक पुन्हा एकदा उभारी देणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

Uddhav Thackeray
Manoj Jarange Patil: फडणवीसांच्या 'होम डिपार्टमेंट'चा जरांगेंबाबत मोठा निर्णय; सुरक्षेसाठी 24 तास...

शिवसैनिकांसाठी मातोश्री आणि ठाकरेंचा आदेश मग ते बाळासाहेब असो वा उद्धव कायमच शिरसावंद्य मानला जातो. मातोश्रीचा आदेशाचं फक्त पालन, हेच शिवसैनिकांना माहीत होते. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारीही त्यांची असायची. आक्रमकतेच्या जोरावर शिवसेनेनं मुंबई, ठाणे यांसह संपूर्ण महाराष्ट्रात आपली पाळेमुळे रोवली. पण ती आक्रमकता मधल्या टप्प्यांत फक्त भाषणापुरतीच मर्यादित राहिल्याची टीकाही अनेकवेळा होत होती.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा झंझावाती कोकण दौरा सध्या सुरू आहे. या त्यांच्या दौऱ्यात बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले शिवसेनेच्या पहिल्या फळीतील शिवसैनिक आता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आपली ताकद उभी करत आहे. यात महिलाही पदर खोचून पुढे असल्याचे दिसून येत आहे.

ठाकरेंनी सध्या तरी टाॅप गिअर टाकत शिवसैनिकांमध्ये हुंकार भरण्याचं काम सुरू केले आहे. शिवसैनिकांच्या रक्त चेतवत गद्दारांना धडा शिकवण्याचा ठाम निश्चय ठाकरेंनी मनाशी बांधला आहे. सहानुभूतीच्या लाटेवर ठाकरे आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभेत कोकणात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करेल अशी चर्चा झडू लागली आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

शिवसेना (Shivsena) फोडून आमदारांसह पक्ष,चिन्हं एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे निष्ठावंत शिवसैनिक प्रचंड संतप्त आहेत.ते जणू निवडणुकांचीच वाट पाहत आहेत,असा माहोल उध्दव यांच्या रायगड जिल्ह्याच्या सभांमध्ये दिसून येत आहे.

अलिबाग,पेण,म्हसळा,माणगाव या सभांमध्ये चाळीस, पन्नास,साठ आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील पुरुष तसेच महिला शिवसैनिकांची गर्दी लक्षणीय आहे. नवमतदार आणि विशी आणि तिशीतील युवक मोठ्या संख्येने दिसत नसले तरी ते सध्या कुठल्याच पक्षांच्या बाजूने नाहीत. याचे कारण म्हणजे दलबदलूपणाचा राग त्यांच्या मनात आहे.

सध्या सुरू असलेल्या उध्दव यांच्या कोकण जनसंवाद यात्रेत हे चित्र दिसून आले असून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मानणारा जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांची फळी आक्रमक झाली आहे. मोठ्या संख्येने या फळीतील पुरुष तसेच महिला वर्ग सभेला हजर राहून आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन उद्धव यांना देताना दिसत आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेतली आक्रमकता, दरारा, जरब मध्यंतरी उद्धव यांच्या नेतृत्वात कुठंतरी हरपल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. पण आता बंडानंतर शिंदे गटासह भाजपकडून सुरू असलेल्या तोडाफोडीच्या राजकारणानंतर उद्धव यांनी आपली टीकेची धार आणखी धारदार केली आहे.

Uddhav Thackeray
Patan BJP : उदयनराजेंचे हात बळकट; विक्रमबाबा पाटणकरांवर फडणवीसांनी सोपवली मोठी जबाबदारी

रायगडमधून पुन्हा एकदा उध्दव यांच्या शिवसेनेकडून अनंत गीते यांची उमेदवारी नक्की आहे. तटकरे यांनी माघार घेतल्यास या जागेवर भाजप आपला उमदेवार देऊ शकतो. मुंबईच्या लाटेवर कोकण स्वार होतो, हे आतापर्यंतचे चित्र आहे. यावेळी सुद्धा तसेच असेल, असे वारे वाहत असून रायगडप्रमाणे तळकोकणातील राजापूर मतदारसंघात सुद्धा उध्दव यांच्या शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे.

विनायक राऊत हे तिसऱ्यांदा खासदारपदासाठी उतरतील. मात्र भाजपचा अजून उमदेवार नक्की होत नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. पण, त्यांना भाजप कमळ चिन्हावर उभे राहायला सांगत असल्याची चर्चा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav Thackeray
MP Amol Kolhe : 'भारताची कांदा निर्यातबंदी पाकिस्तानच्या फायद्याची; आपल्या शेतकऱ्यांचे 2 हजार कोटींचे नुकसान'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com