Shivsena Political : मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदाचे वर्ष हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात भरगच्च कार्यक्रम आणि रोषणाई, सजावट केली जात आहे. (Marathwada) यासाठी राज्य सरकारने तब्बल ४० कोटी रुपये दिले आहेत.
या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) येणार असल्याने प्रशासन जोरात तयारीला लागले आहे. (Shivsena) मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमावर अवाढव्य खर्च केला जात असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
एका वृत्ताचा हवाला देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. (Aurangabad) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अनावश्यक रोषणाई व मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकार ४० कोटी रूपये एवढा अवाढव्य खर्च करणार आहे.
मिंधे गटाचे दिल्लीतील बॉस या कार्यक्रमासाठी येणार म्हणून हा खर्च केला जात आहे का ? असा सवाल दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. त्यांना खूष करण्यासाठी केवढा हा आटापिटा. याच महाराष्ट्रद्रोही गृहस्थाने राज्याच्या राजकारणाची हास्य जत्रा केली आहे.
तरीही यांच्या मनोरंजनासाठी लोकांचे पैसे असे वायफळ खर्च केले जात आहेत. यापेक्षा घटनेने आपल्याला शासन म्हणून दिलेली जबाबदारी पार पाडत मराठवाड्यात दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीबाबत काहीतरी उपायोजना करा, असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.