Mp Imtiaz Jaleel On PM Modi : प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करण्याची घोषणा मोदीजी करणार आहेत का ?

AIMIM News : एक खासदार म्हणून विशेष अधिवेशन कशासाठी हे मला कळू शकेल का?
Mp Imtiaz Jaleel On PM Modi : प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करण्याची घोषणा मोदीजी करणार आहेत का ?
Published on
Updated on

Aurangabad Political News : केंद्रातील मोदी सरकारने येत्या १८ सप्टेंबरपासून संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे विशेष अधिवेशन बोलवण्याचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. (Loksabha Session News) काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यापासून सगळ्याच विरोधकांनी या संदर्भात मोदी यांना प्रश्न विचारत अधिवेशनाचा अजेंडा जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Mp Imtiaz Jaleel On PM Modi : प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करण्याची घोषणा मोदीजी करणार आहेत का ?
Jitendra Awhad News : सावध रहा, संविधान बदलण्याचा भाजपचा डाव!

परंतु मोदी (PM Modi) सरकार काही विशेष अधिवेशनाचे प्रयोजन काय? हे सांगायला तयार नाही. एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.

कदाचित पंतप्रधान मोदी हे १८ सप्टेंबरच्या विशेष अधिवेशनात देशातील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा करतील, असा चिमटा ट्विटच्या माध्यातून काढला आहे. (AIMIM) एक खासदार म्हणून विशेष अधिवेशन कशासाठी हे मला कळू शकेल का? असा सवालही इम्तियाज यांनी उपस्थितीत केला होता.

त्यानंतर त्यांनी पुन्हा ट्विट करत मोदी सरकारला धारेवर धरले आहे. मला वाटते नरेंद्र मोदी कोणताही आयकर, जीएसटी नाही आणि सर्व वस्तूंवरील सर्व शुल्क माफ केले जातील असे घोषित करणार आहेत! आणि २०१४ मध्ये दिलेल्या वचनानुसार प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील. १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात या घोषणा केल्या जातील. ही माझी इच्छा यादी आहे, असा टोला इम्तियाज यांनी लगावला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com