State Finance Minister Dr. Karad-Mp Imtiaz Jalil News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil News : वाढदिवस साजरा करणाऱ्या मंत्र्यांना ठेवीदारांचे दुःख समजत नाही का ?

सरकारनामा ब्युरो

Aimim : गोरगरिब, कष्टकरी, सर्वसामन्यांच्या दोनशे कोटीहून अधिकच्या ठेवी लुबाडून आदर्श पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणतो मला काही आठवत नाही? आपल्या आयुष्याची कमाई बुडाली म्हणून एका ठेवीदाराने आत्महत्या केली. (Imtiaz Jalil News) त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांना मात्र वेळ नाही. पालकमंत्री भुमरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड वाढदिवस साजरे करण्यात व्यस्त आहेत.

कालपर्यंत सहकारमंत्री असलेल्या सावेंना या घोटाळ्याची काही माहितीच नाही, अशा शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला. मुंबईत उद्यापासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना देखील या ठेवीदारांना भेटावेसे वाटले नाही. (AIMIM) त्यांचा प्रश्न विधानसभेत मांडावा असे त्यांना वाटले नाही का? अशी टीका देखील त्यांनी केली.

आदर्श पतसंस्थेतील दोनशे कोटीहून अधिकचा घोटाळा नुकताच उघडकीस आला. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी या पतसंस्थेत लाखो रुपये गुंतलेल्या ठेवीदारांच्या भेटी घेवून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. (BJP) दोन-तीन दिवसांचे आंदोलन आणि मोर्चाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी आदर्शचा अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह अन्य तीन संचालकांना अटक केली.

ही कारवाई झाली असली तरी ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत, इतर दोषी संचालक, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी जे कोणी या घोटाळ्यात दोषी असतील त्या सर्वांना अटक व्हावी, यासाठी उद्या (ता.१७) अकरा वाजता क्रांतीचौकातून पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ठेवीदारासह इम्तियाज जलील देखील सहभागी होणार आहे. तत्पुर्वी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांवर टीका केली.

देशातल्या सगळ्या बॅंका माझ्या ताब्यात आहेत, असे जाहीर भाषणातून सांगणारे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ज्या शहरात आहे, तिथे आदर्श पतसंस्थेत घोटाळा होतो, पण त्यांना याचे काही सोयरसुतक नाही. ज्यांचे पैसे बुडाले त्या ठेवीदारांना भेटावे, त्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी पुढाकार घेण्याऐवजी ते वाढदिवस साजरा करण्यात दंग आहेत. पालकमंत्री संदीपान भुमरे हे देखील त्यातले, त्यांना देखील जिल्ह्याचे पालक म्हणून या ठेवीदारांना भेटावेसे वाटले नाही.

सहकार मंत्री राहिलेले अतुल सावे यांना या घोटाळ्याची माहिती नसावी याबद्दल देखील आश्चर्य वाटते. अब्दुल सत्तार हे देखील जिल्ह्यातील मंत्री आहेत, त्यांना देखील या घोटाळ्यात ठेवी बुडालेल्यांबद्दल सहानुभूती नसावी हे दुर्दैव आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मोठे नेते आहेत. त्यांनी या प्रश्नाला अधिवेशनात वाचा फोडली तर ठेवीदारांना ठेवी परत मिळण्यास मदत होवू शकते.

सरकार या प्रकरणात लक्ष घालून तातडीने पावले उचलली जातील. पण त्यांनाही ठेवीदारांची काळजी नाही. सगळ्या मंत्री, नेत्यांनी ठेवीदारांकडे पाठ फिरवली असली तरी मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. आरोपींना अटक होवून ठेवीदारांचे पैसे परत मिळणार नाहीत. ते मिळावे यासाठी ठरल्याप्रमाणे आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत, असे देखील इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT