Sanjay Shirsat On Ajit Pawar : अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका ; आधी टीका, आता बचाव..

Shivsena : ठाकरे मुख्यमंत्री असतांना अडीच वर्षात निधीसाठी मी त्यांना अनेक निवेदन दिली. पण एकावरही त्यांनी सही केली नाही.
Sanjay Shirsat On Ajit pawar
Sanjay Shirsat On Ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : अजित पवार त्यांच्या पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्यांना निधी देतात, पण शिवसेनेच्या आमदारांना नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या शिंदे गटांची आता मात्र गोची होतांना दिसते आहे. (Sanjay Shirsat On Ajit Pawar) राष्ट्रवादीचा सरकारमध्ये प्रवेश, ९ मंत्रीपद आणि विरोध असूनही अर्थ खाते पुन्हा अजित पवारांकडे गेल्यामुळे शिंदे गट हैराण आहे.

Sanjay Shirsat On Ajit pawar
Chandrkant Khaire On Fadanvis : फडणवीसांनी आता गप्प बसावे, गद्दारांना सांभाळून त्यांची तब्यत उतरली...

तिकडे विरोधकही यावरून टीकेची झोड उठवत असल्याने आता इच्छा नसली तरी शिंदे गटाच्या आमदार, मंत्र्यांना अजित पवारांची (Ajit Pawar) बाजू घ्यावी लागत आहे. उद्यापासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पत्रकारांनी विचारलेल्य प्रश्नांना उत्तरे दिली. अर्थात अजित पवार यांना मिळालेल्या अर्थ खात्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर समर्थन करतांना शिरसाट यांची बरीच कसरत झाली.

अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, ते अर्थ खाते सांभाळायाल सक्षम आहेत. (Shivsena) तेव्हा आम्ही कुंभकर्णाच्या झोपेत होते, त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांच्या आमदारांना, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्यांना निधी दिला. त्यांची चूक नव्हती तर आमचे मुख्यमंत्री झापलेले होते. आता ती परिस्थिती नाही, आम्ही सक्षम आहोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

त्यावेळी आम्ही राष्ट्रवादीसोबत होतो, आमचा पक्ष मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दावणीला बांधला होता. आज राष्ट्रवादी आमच्यासोबत सरकारमध्ये आहे, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे निधीच्या बाबतीत कुणावरही अन्याय होणार नाही, त्यांची चिंता तुम्ही करू नका, असे समर्थन शिरसाट यांनी केले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना अडीच वर्षात निधीसाठी मी त्यांना अनेक निवेदन दिली. पण त्यापैकी एकावरही त्यांनी सही केली नाही, ती दाखवली तर मी आमदारकी सोडून देईन, असा दावा देखील शिरसाट यांनी केला. अजित पवार सरकारमध्ये येणार हे आम्हाला माहित होते, या गोष्टी एका रात्रीतून घडत नसतात, असेही शिरसाट यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com