Minister Abdul Sattar News  Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : सत्तार मतदारसंघात भाजपला विचारेना, नड्डा, बावनकुळेंकडे तक्रार करणार..

Bjp : प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या सिल्लोड-सोयगाव (Sillod-Soygaon Constituency) मतदारसंघातील भाजपच्या स्थानिक नेत्यांना विचारात घेत नाहीत. कुठल्याही कार्यक्रमाची मग तो खाजगी असो की शासकीय भाजपला पुर्णपणे डावलेले जाते, असा आरोप सोयगाव तालुक्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. उद्या होणाऱ्या सोयगाव येथील प्रशासकीय इमारतीच्या भुमीपूजनासाठी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील येणार आहेत.

भाजपचे मोठे मंत्री शहरात येत असतांना (Bjp) भाजपला मात्र या कार्यक्रमाची कल्पनाचा देण्यातआली नसल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केला आहे. राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या भाजपला कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जाते, अशी तक्रार आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करणार असल्याचे स्थानिक भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे ऐन कार्यक्रमाच्या आधीच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबद्दल भाजपची नाराजी समोर आली आहे. सोयगावच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनवरून भाजप,शिंदे गटात जुंपली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे बुधवारी उद्या ( ता.२६) सोयगाव दौऱ्यावर येत असून शहरातील भाजप कार्यकर्त्यांना या भूमिपूजन कार्यक्रमसाठी शिंदे गटाने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाची कल्पनाही आम्हाला देण्यात आलेली नसल्याचे माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी म्हटले आहे. सोयगावात भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात येत असून कृषीमंत्री सत्तार यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात येणार आहे.आठ कोटी पन्नास लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे असून कार्यक्रमासाठी शहरातील भाजपच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्याला विश्वासात घेण्यात आलेले नाही. या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची देखील तक्रार करण्यात येणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT