Marathwada : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Parbhani Market Committee) संचालक मंडळाच्या निवडणूकीत अतिरिक्त ठरलेल्या १७ उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. परभणी बाजार समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे तर उपसभापती पद हे कॉग्रेसकडे राहणार असल्याची माहिती आमदार सुरेश वरपूडकर व खासदार संजय जाधव यांनी दिली.
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकी संदर्भात मंगळवारी आज आमदार सुरेश वरपुडकर व खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेस माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, अतुल सरोदे, पंजाबराव देशमुख आदींची उपस्थिती होती.
आमदार वरपुडकर (Suresh Varpudkar) म्हणाले, उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत मोठ्या प्रमाणावर अर्ज माघारी करिता गर्दी झाली होती. त्यामुळे यात काही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले होते. (Shivsena) या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयावर आक्षेप दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यासंबंधीची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता अतिरिक्त ठरलेल्या त्या १७ समर्थक उमेदवारांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत पॅनल पूर्ण बहुमताने निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या अधिकृत पॅनल मधून आता गणेश घाटगे, अजय चव्हाण, सचिन लोहट, पंढरीनाथ घुले, संग्राम जामकर, अरविंद देशमुख, तानाजी भोसले, काशीबाई रेंगे, शोभा जवंजाळ, गंगाप्रसाद आनेराव आणि स्वराजसिंह परिहार, विनोद लोहगावकर,पांडुरंग खिल्लारे, घनश्याम कणके, संदीप झाडे, सोपानराव मोरे,गणेश शेंगूळे व श्री. पठाण हे रिंगणात रिंगणात आहेत. सर्व १८ उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील असा दावा खासदार संजय जाधव यांनी देखील व्यक्त केला.
या १७ जणांचा पाठींबा
महाविकास आघाडीच्या अधिकृत पॅनलला आपला पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवारात समशेर वरपूडकर, चंद्रकांत पांगरकर, दिलीप साबळे, संतोष इंगळे, सर्जाबाई मोरे,गोकुळ लोखंडे, मंचकराव वाघ,शरद रसाळ, प्रशास ठाकूर, संजय साखरवाल, रमेशराव देशमुख, दामू सानप, गजानन देशमुख यांच्या आईचा समावेश आहे.महाविकास आघाडीत खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील यांचे समर्थक सहभागी आहेत.
काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा दोन नेते पॅनलमध्ये आहेत. त्यामुळे हा पॅनल महाविकास आघाडीचाच आहे. कपबशी निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार आहे असेही वरपूडकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच स्वराजसिंह परिहार व शोभा जवंजाळ हे दोन उमेदवार पॅनल मधून समाविष्ट आहेत. या आघाडीतूनच पुढील पाच वर्ष सभापतीपद हे शिवसेनेचा व उपसभापतीपद हे काँग्रेसकडे राखण्याचा निर्णय सुद्धा एकमुखाने घेण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.