Maratha Reservation News : मराठा आरक्षण व मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसींचे आरक्षण लागू करा, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी सतरा दिवस उपोषण केले. दरम्यान, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली होती. मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे मिळणारे आरक्षण टिकणार नाही. दोन समाजात भांडणे होतील.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
त्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी जाधव यांनी अंतरवालीतच स्पष्ट केली होती. (Maratha Reservation) त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर येथे गॅलक्झी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांची पुन्हा भेट घेतली. अंतरवालीत घेतलेल्या भूमिकाचा जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी पुनरुच्चार करत आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय त्याचा लाभ मराठा समाजाला होणार नाही. तुम्ही जी मागणी करताय, ती न्यायालयात टिकणार नाही.
त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे. मराठा आरक्षणासाठी संसदेत कायदा करून ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची मागणी आपण केंद्र सरकारकडे करावी. (Marathwada) त्यासोबतच खुल्या प्रवर्गासाठी स्वतंत्र २० टक्के आरक्षण मिळावे, ही मागणीदेखील आपण करावी, अशी विनंती जाधव यांनी जरांगे पाटील यांना केली.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होतो. चांगले गुण मिळवूनदेखील त्यांना शिक्षण घेता येत नाही. आरक्षण नसल्याने लाखो रुपयांची फीस भरणे शक्य होत नसल्याने तरुणांचे वाटोळे होत आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, मुस्लिम, जैन धर्मीयांसह इतरांना आरक्षण दिले तरच त्यांचे भविष्य उज्वल ठरेल.
जरांगे यांनी पंतप्रधान मोदींकडे मराठा आरक्षणासोबतच खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणाची मागणीदेखील करावी. राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय सरकार घेऊ शकते, तर मग आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला टिकणारे आणि खुल्या प्रवर्गाला २० टक्के आरक्षण का देऊ शकत नाही ? असा सवालही हर्षवर्धन जाधव यांनी जरांगे यांच्या भेटीत केल्याचे सांगितले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.