Raosaheb Danve sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : आता तरी जाल ना, ठाकरेच्या टीकेला मी जंगलातला वाघ म्हणत दानवेंचा टोला..

Political News : संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेतूनच ठाकरे यांनी लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे उमेदवार कल्याण काळे यांचा प्रचार केला होता. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उडवण्यात पायलटने असमर्थता दर्शवल्याने ऐनवेळी ठाकरे यांची जालन्याती सभा रद्द करावी लागली होती.

Jagdish Pansare

Chhatrpati Sambahji nagar News : पंचवीस वर्ष खासदार होतात, मग जालन्याचे सगळे प्रश्न संपले का? गुळगुळीत रस्ते, नळ उघडला की पाणी? येते का? जालन्याचे कल्याण करायचे असेल तर रावसाहेब दानवेंना आता तरी जाल ना, अशा प्रश्न मतदारांनी विचारला पाहिजे, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.

संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या (MVA) सभेतूनच ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे उमेदवार कल्याण काळे (kalyan Kale) यांचा प्रचार केला होता. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उडवण्यात पायलटने असमर्थता दर्शवल्याने ऐनवेळी ठाकरे यांची जालन्याती सभा रद्द करावी लागली होती. याबद्दल त्यांनी संभाजीनगरच्या सभेत कल्याण काळे यांची माफी मागितली. (Raosaheb Danve News)

त्यांना निवडून आणण्याचे आवाहन मतदारांना केले. ते करत असतांना ठाकरेंनी दानवेंच्या सहाव्यांदा निवडणूक लढवत असल्याचा उल्लेख करत आता आराम करा, असा टोला लगावला होता. त्यावर रावसाहेब दानवे यांनी मी जंगलातला शेर आहे, लोकांमधून निवडून येतो. तुम्ही मागच्या दारातून एकदा निवडून आलात.

हिमंत असेल तर जनतेमध्ये या आणि निवडणूक लढवून दाखवा, असे म्हणत ठाकरेंना आव्हान दिले. 35 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत सातवेळा निवडणूक लढलो, आमदार, खासदार झालो. केंद्रात दोन वेळा मंत्री झालो. घरातून राज्याचा कारभार हाकणारे, व्हिडिओ काॅन्फरन्सवर बोलणारे असे मी बरेच नेते पाहिले आहेत, असा चिमटा दानवे यांनी ठाकरेंना काढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत दरवाजे लावून घरात बसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात दानवे यांनी आपल्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. हा पठ्ठ्या पसत्तीस वर्षांपासून राजकारणात आहे, असे सांगत माझा राजकीय अनुभव तुमच्यापेक्षा जास्त असल्याचे दानवे म्हणाले. जालना मतदारंसघात महायुतीचे रावसाहेब दानवे विरुद्ध महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे यांच्यात सरळ लढत होत आहे.

SCROLL FOR NEXT