Raosaheb Danve News : ...जेव्हा रावसाहेब दानवे भरस्टेजवरुन काढतात सेल्फी!

Jalna Loksabha Election 2024 : भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघात बारा वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती, परंतु त्यांनी मतदाना पुरताच आपला वापर केला.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama

Jalna News : जालना लोकसभा मतदारसंघाचा पाच टर्म खासदार, मंत्री म्हणून मी सर्व जाती-धर्म समुदायाची कामे केली. आलेला प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे या भावनेतून सगळ्याची कामे करत गेलो. यात मुस्लिम समाजही कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. चाळीस वर्षाच्या राजकीय प्रवासात माझी या समाजाला आणि त्यांची मला कायम मदतच झाली आहे, असे म्हणत भोकरदन येथे आयोजित अल्पसंख्याकांच्या मेळाव्यात रावसाहेब दानवे (Raosaheb Danve ) यांनी उपस्थितांसोबत सेल्फी घेतली.

भाजपने रावसाहेब दानवे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली. पक्षाने त्यांच्या नावाची घोषणा केली तेव्हापासून मतदारसंघात त्याचा प्रचार सुरू आहे. पदयात्रा, गावभेठी, संवाद, व्यापारी, शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी अशा समाजातील सर्वच घटकांशी संपर्क करत दानवे आपल्या पाच टर्म खासदारकीच्या काळात मतदारसंघात झालेल्या विकास कामांची माहिती देत आहेत. याच पार्श्वभूमीवर भोकरदन येथे अल्पसंख्याक समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Raosaheb Danve News
Loksabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात ; अपक्ष उमेदवाराची निशाणी 'तुतारी'

मुस्लिम समाजातील मिञांना गेल्या चाळीस वर्षांपासून मी मदत करत आलोय. शहरात वास्‍तव्‍यास असतांना मुस्लिम वस्तीत मी राहिलो पंरतु कधीच वादाचा प्रसंग उद्भवला नाही की कोणाचे नुकसान झाले नाही. मित्रत्व, बंधू भाव जपत या समाजाने मला कायमच मदत केली आणि मी पण त्यांच्या मदतीला धावून गेलो. रमजान या मुस्लिम धर्मियांच्या पवित्र महिन्यात गरीबांना नेहमीच बाजार पेठेत जावून मदत करण्याची माझी भूमिका राहीली आहे.

माझ्या राजकीय प्रवासात मी मुस्लिम बांधवांना नगर परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, सहकारी कारखाना, शैक्षणिक संस्थांमध्ये विविध पदांवर संधी दिली. तसेच हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. भोकरदन, जाफराबाद, अंबडसह जालना लोकसभा मतदारसंघात ईदगाह साठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. एवढेच नाही तर मुस्लीम बांधवांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) सरकारच्या माध्यमातून घरकुल वाटप, राशन, कामगारांना किट यासह विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केवळ मुस्‍लीम बांधवांचा मतदानासाठी वापर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

या समाजाच्या प्रगती, विकासासाठी कुठलेच प्रयत्न केले नाही. भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघात बारा वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती, परंतु त्यांनी मतदाना पुरताच आपला वापर केला. तुमच्यामध्ये गैरसमज पसरवून व भुलथापा मारून भाजपबद्दल भीती निर्माण केली. आगामी काळात मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी मला पुन्हा संधी द्या, असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना केले. आपला समाज हा व्यवसाय, व्यापार आणि छोट्या-मोठ्या उद्योगावर आपला उदरनिर्वाह चालवणार आहे.

मुस्लिम समाजाला चांगले शिक्षण, आरोग्य, नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी आणि आपले जीवनमान उंचावे यासाठी मोदी सरकार ने विविध विकास योजनेंतर्गत मदत केली व करत आहेत. सर्व देशवासियांची प्रगती हीच मोदीजींची गॅरंटी आहे, असा विश्वास दानवे यांनी यावेळी उपस्थितांना दिला. मी विकास कामांवर बोलतो, पण विरोधक फक्त टीकाच करतात. त्यांनी तेच करावे, मी मात्र विकासाच्या मुद्यावरच लोकांसमोर जाणार, असेही दानवे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Raosaheb Danve News
Lok Sabha Election 2024 : अमेठी-रायबरेलीसाठी काँग्रेसची खास रणनीती; दोन माजी मुख्यमंत्र्यांवर मोठी जबाबदारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com