Duel between Danve-Gorantyal News Sarkarnama
मराठवाडा

Duel between Danve-Gorantyal : आमची डबल इंजिनची गाडी बसायचे त्याने बसा, पण ड्रायव्हर मीच..

Congress-Bjp : मै चलती ट्रेन मे नही बैठता, म्हणत तुर्तास तरी दानवेंची आॅफर गोरंट्याल यांनी स्वीकारलेली नाही हे स्पष्ट केले.

सरकारनामा ब्युरो

Jalna Political News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानेव व जालन्याचे काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल एकाच व्यासपीठावर आले की त्यांच्यात जुगलबंदी रंगते. यापुर्वी अनेकदा याचा अनुभव आला आहे. (Duel between Danve-Gorantyal ) आज देखील जालन्यातील रेल्वे इंजिन (लोकोमोटीव्ह) बसवण्याच्या भुमीपूनज सोहळ्यात या दोघांमधील टोलेबाजीने उपस्थितांचे चांगले मनोरंजन केले.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, आमचे डबल इंजिनचे सरकार आहे, ज्याला कुणाला आमच्या गाडीत बसायचे त्याने बसावे. पण ड्रायव्हर मीच राहणार, अशा शब्दांत त्यांनी काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांना थेट भाजपमध्ये येण्याची आॅफरच दिली. यावर आपल्या हिंदी आणि शायराना अंदाजात ` मै चलती ट्रेन मे कभी बैठा नही`, खाली इंजिन होणेसे काम नही चलता, उसका हमारा डब्बा भी जरूरी है`, असे प्रत्युत्तर देत गोरंट्याल यांनी देखील रंगत आणली.

या दोन्ही नेत्यांच्या भाषणाची जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. (Jalna) दानवे आणि गोरंट्याल जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यात राजकीय मैत्री आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हे दोघे एकाच कार्यक्रमात दिसून आले आहेत. गोरंट्याल यांना भाजपमध्ये येण्याची आॅफर देण्याची ही पहिली वेळ नाही.

यापुर्वी देखील जाहीर कार्यक्रमातून दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी देखील गोरंट्याल यांना भाजपमध्ये येण्यासाठी गळ घातली होती. परंतु गोरंट्याल ही आॅफर काही स्वीकारत नाही. जिल्ह्याच्या राजकारणात अर्जून खोतकर विरुद्ध गोरंट्याल या संघर्षात दानवेंनी कायम गोरंट्याल यांची साथ दिल्याचे बोलले जाते. आता राज्यात जरी शिंदेगट आणि भाजप सत्तेत असली तरी दानवेंचे झुकते माप हे गोंरट्याल यांच्याकडेच अधिक असल्याचे पहायला मिळाले आहे.

नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत होवू नये, यासाठी गोरंट्याल यांनी दानवे यांच्या मार्फत बरेच प्रयत्न केले. पण आधी महापालिका नको,अशी भूमिका घेणारे दानवे राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेच्या मागणीला समर्थन देवू लागले. त्यामुळे गोरंट्याल दानवे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. परंतु शहर आणि जालना विधानसभा मतदारसंघासाठी गोरंट्याल यांना नमते घ्यावे लागले. आता दानवे यांनी भाजपमध्ये यायचे तर या, पण नेतृत्व माझेच स्वीकारावे लागेल, असे अधोरेखित केले.

यावर मै चलती ट्रेन मे नही बैठता, म्हणत तुर्तास तरी दानवेंची आॅफर गोरंट्याल यांनी स्वीकारलेली नाही हे स्पष्ट केले. जालना नगर परिषदेच्या अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज उद्यानात १५० फुट उंच राष्ट्रीय ध्वज आणि मोती तलाव चौपाटीवर रेल्वे इंजिन (लोकोमोटीव्ह) बसविण्याचा भुमिपुजन सोहळा आज संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाउपाध्यक्ष भास्कर दानवे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह मान्यवर व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT