Sanjay Shirsat On Sanjay Raut : राऊतांचा आविर्भाव पाहता, ते पक्षप्रमुख होवू शकतात, शिरसाटांनी डिवचले..

Maharashtra : ज्या पक्षाकडे चिन्ह नाही, नाव नाही, अशा पक्षात आमचे आमदार, खासदार झक मारायला जातील का?
Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay  Raut News
Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay Raut NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक युद्ध काही केल्या थांबायला तयार नाहीत. (Sanjay Shirsat On Sanjay Raut) संजय राऊत यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला आणि त्यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांना संजय शिरसाट सडेतोड आणि आक्रमकपणे उत्तरे देत आहेत.

Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay  Raut News
MP Omraje Nimbalkar News: केंद्राने सन्मानित केलेल्या अर्चना मानेंचा आम्हाला अभिमान..

संजय राऊत (Sanjay Raut) यांना आम्ही आमदारांनी मतदान केले नसते तर ते खासदार होवू शकले नसते. सामना दैनिकाच्या एका छोट्याश्या केबिनमध्ये त्यांना बसून राहावे लागले असते. कदाचित त्यांना तिथूनही हाकलून दिले असते. जगात सगळ्यात हुशार आणइ सगळंच आपल्याला कळते हा त्यांचा अविर्भाव पाहता ते शिवसेनेचे पक्षप्रमुख देखील होवू शकतात, असा टोला संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे २२ आमदार आणि काही खासदार आमच्या संपर्कात असल्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या दाव्याची देखील शिरसाट यांनी खिल्ली उडवली. (Shivsena) संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेचे वाटोळे झाले आहे, अजूनही हा माणूस थांबायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांच्या देखील आता डोक्यावरून पाणी गेले आहे. आता तरी त्यांना हाकला, नाहीतर उरलेला पक्ष देखील ते बुडवतील.

पक्षाची सगळी सुत्रं जणू त्यांच्याच हाती सोपवण्यात आल्या सारखा त्यांचा थाट आणि रुबाब असतो. हे पाहता शिवसेनेच्या वर्धापनदिनीच संजय राऊत पक्षप्रमुख होतील की काय? असे मला वाटायला लागले आहे. दुसरे ते विनायक राऊत, म्हणे शिंदे गटाचे २२ आमदार आणि काही खासदार आमच्या संपर्कात आहेत. अहो ज्या पक्षाकडे चिन्ह नाही, नाव नाही, अशा पक्षात आमचे आमदार, खासदार झक मारायला जातील का? ते अपात्र ठरणार नाहीत का? पण काही तरी बोलायचे म्हणून विनायक राऊत बोलतात, त्याकडे आम्ही फार गांभीर्याने पाहत नाही, असेही शिरसाट म्हणाले.

अॅक्टर सुषमा अंधारे यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते, त्यात मला पोलिसांची क्लीन चीट मिळाली आहे. पण त्यांचा पोलिसांवर किती विश्वास आहे, मला माहित नाही. पण एक लढाई जिंकलो आहे, कोर्टातली लढाई अजून लढावी लागणार असल्याचे शिरसाट म्हणाले. राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार निश्चितच होणार आहे, तो केव्हा होईल याची वाट मी पाहत बसलेलो नाही. तो जेव्हा व्हायचा तेव्हा होईल आणि मला मंत्रीपद मिळायचे असेल तर तेही मिळेल. पण त्याकडे लक्ष न देता मी माझे काम करतोय, असेही शिरसाट म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com