Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : 'रणांगणात कालीच रूप घेऊ येत आहे'; पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?

Pradeep Pendhare

Beed News : 'मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू', असे म्हणत वंचितांना त्रास दिल्यास, तर हिशेब करणार, असे सांगून लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येत आहे.

"आपला डाव खेळायचा की नाही? नवरात्रीत आपण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना केली. आता कालीचं रूप घेतलं आहे. रणांगणात कालीचं रूप घेऊन येत आहे", असे म्हणत पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.

बीडमधील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर भाजपच्या (BJP) नेत्या, आमदार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. पंकजा मुंडे भाषणाला उभ्या राहताच, भगवान गडावर जमलेल्या समुदायाने जल्लोष केला. पंकजा यांनी 'मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू' असा शेरोशायरीचा अंदाजात भाषणाची सुरवात केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "मला गोपीनाथ मुंडे यांनी वारसा दिला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे भगवान गडावरून दिल्ली, मुंबई नाही, तर पंकजा दिसत होती. त्यातून मला एक प्रकारे संदेश दिला होता. संघर्षाचा वारसा दिला होता. याच संघर्षातून भगवान भक्तीगड उभा राहिला. गोपीनाथ मुंडेसाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला. मला माझ्या मुलापेक्षा जनता अधिक प्रिय आहे".

'जीएसटी'चा छापा पडला होता, तेव्हा याच अठरा पगड लोकांनी 12 कोटी रुपये जमा करून दिले होते. आमदार झाले. मंत्री झाले. तेव्हा प्रेम दिले. निवडणुकीत पडले, तर डबल प्रेम दिले. माझ्या पाच लेकरांनी जीव दिला. या सर्वांवर माझ्या लेकरापेक्षा जास्त जीव लावते. मी कुणालाही घाबर नाही. मी ऊसतोड कामगारांचा संघर्ष पाहताना, पोटात पीळ पडते. त्यांचे आयुष्य बदल्याशिवाय मृत्यूला स्वीकारणार नाही, असा शब्द पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिला.

भटक्यांना त्रास दिल्यास हिशेब करू

दसरा मेळाव्याला दरवर्षी साष्टांग नमस्कार घातले. मी तु्म्हाला साष्टांग नमस्कार घालते, कारण साहेबांनी तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकली आहे. विजय असो की पराभव, यात तुम्ही मला नेहमीच मान-सन्मान दिला. आता तुम्हा सर्वांना मान देण्यासाठी मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही? या मंचावर अठरा पगड जातीचे लोक आहे, या ठिकाणी सर्व धर्माचे लोक आलेत, याची आठवण करून देत वंचितांना, दलितांना, भटक्यांना, गरिबांना त्रास दिल्यास त्याचा हिशेब केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.

जाती-पातीचं राजकारण खपवून घेणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविताना मावळे त्यांच्याबरोबर होते. अठरा पगड जाती त्यांच्याबरोबर होत्या. या माळव्याचे रक्त देखील मिसळलं, तर कोणत्या जातीचं ते देखील कळणार नाही. मग आता जाती-पातीचं राजकारण खपवून घेणार नाही. जात विचारणारा समाज घडवायचा नाही. जातीवर स्वार होणाऱ्यांचे मागे उभे राहणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी देत छत्रपती उदयनराजे यांच्या घरी गेल्याची आठवण सांगितले.

तर बैलगाडीने येईल

"उदयनराजे यांच्या घरी गेल्यावर एकीकडे त्यांच्या वडिलांचा, तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडेचा फोटो आहे. मग जातीवर का स्वार व्हायचं? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. आमदार झाले, मंत्री झाले, पराभव पाहिला. खासदारकी हरले. पुन्हा आमदार केले. पण ही आमदारकी गोड नाही वाटत. पाच लेकरांनी जीव दिला. आमदारकी, खासदारकी नसली, तरी तुम्ही पाच वर्षे येत होता". माझ्या समाजात वंचित, पीडित आहे. पत नाही, ऐपत नाही, यासाठी मी राजकारणात आहे. तुम्हाला अभिमान वाटतो म्हणून हेलिकाॅप्टर येते, तुम्ही म्हणाला, तर बैलगाडीने येईल, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

अब जो भी होगा मैं देखुंगी...

"जिजाई, सावित्रीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्षाची आठवण पंकजा मुंडे यांनी काढली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचं दूध मिळाल्यानं, हे वाघिणीचं दूध ठरलं. आणि यातून तुम्ही-आम्ही गुर्रगुर्रत आहोत. असे सांगून संघर्षासाठी तयार राहा. निवडणुका आहेत. लवकरच भेटायला येते. घोडा मैदानात लांब नाही. परळीत आम्ही हिशोबासाठी तयार आहोत. तो घेऊच. चांगले दिवस आणण्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात येणार आहे. कोयत्यांना धार लावा. दिवाळी केल्याशिवाय जाऊ नका. अब जो भी होगा मैं देखुंगी", असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT