Mla Pradip Jaiswal News Sarkarnama
मराठवाडा

MLA Pradeep Jaiswal On CM Shinde : आधी निधीच मिळत नव्हता, आता अकरा महिन्यातच अडीचशे कोटी..

Shivsena News : माझ्या राजकीय आयुष्यात मतदारसंघासाठी मिळालेला हा सर्वाधिक निधी आहे.

Jagdish Pansare

Shivsena Political News : लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर लोकांची कामे झाली पाहिजेत. तुमच्या राजकारणाशी सर्वसामान्यांना काही देणेघेणे नसते. आधीच्या सरकारमध्ये आम्ही अनेकदा निधीची मागणी केली पण तो मिळाला नाही. (CM Eknath Shinde News) आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केवळ अकरा महिन्यातच माझ्या मतदारसंघासाठी अडीचशे कोटींचा निधी मिळाला, त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, अशा शब्दात आमदार प्रदीप जैस्वाल यांनी समाधान व्यक्त केले.

माझ्या राजकीय आयुष्यात मतदारसंघासाठी मिळालेला हा सर्वाधिक निधी आहे, त्यामुळे मी आता लोकांची कामे करू शकत आहे, असा दावाही जैस्वाल यांनी केला. `काॅफी विथ सकाळ` मध्ये बोलतांना आमदार जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांनी महाविकास आघाडीचे सरकार आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारची तुलना केली. लोक तुम्हाला पद, पैशामुळे नाही, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय काम केले, त्यांच्या मदतीला धावून गेलात का? यावरून ओळखत असतात.

छत्रपती संभाजीगरच्या राजकीय इतिहासात अपक्ष आमदार निवडून येण्याचे भाग्य माझ्या नशिबी आले, याचा आनंद वाटतो. (Shivsena) अकराच महिन्यात अडीचशे कोटी रुपयांचा निधी आणि त्यातून माझ्या मध्य मतदारसंघात शंभर कोटीहून अधिकचे दर्जेदार रस्ते मला करता आले. जे लोक वर्षानुवर्षे चिखल तुडवत जात होते, ते आज सिमेंट रस्त्यावरून जातांना पाहून समाधान वाटते.

विकासकामे करतांना कधी जात-पात, धर्म पाहिला नाही, म्हणूनच लोक माझ्यावर आजही प्रेम करतात. माझ्या समाजाची तीन हजार मतं नसतांना मला या शहरातील, जिल्ह्यातील नागरिकांनी नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार केले. या जोरावरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही मला लोक पुन्हा निवडून देतील, असा विश्वासही जैस्वाल यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिंदे गटच लढवणार, असा दावाही त्यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT