Shivsena Political News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला असला तरी त्यामागची कारण वेगळी आहेत. मतदारसंघाचा विकास आणि ज्या लोकांनी आपल्या मोठ्या अपेक्षेने निवडून दिले, त्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी केवळ मीच नाही, तर शिवसेनेच्या चाळीस व अपक्ष अशा ५० आमदारांनी उठाव केला होता. (Shivsena UBT) त्यामुळे आता जुन्या पक्षातील नेते, लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल वाईट बोलण्यात मी वेळ घालवणार नाही.
त्याने काही साध्यही होणार नाही, ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या सारख्या सामान्य माणसाला महापौर, आमदार, खासदार केले, त्यांच्या कुटुंबियांबद्दल किंवा मातोश्रीत राहणाऱ्या कुठल्याही व्यक्ती बद्दल मी कधीही वाईट बोलणार नाही, असे शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांनी सांगितले. `काॅफी विथ सकाळ`, मध्ये त्यांनी राज्यातील सद्यस्थितीवर आपली भूमिका मांडली.
शिंदे गटाने उठाव केल्यानंतर प्रत्येक आमदार आणि आता सत्तेत असलेले मंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो. (Marathwada) पण आपण कधीही मातोश्रीबद्दल बोलला नाहीत किंवा टीका केली नाही, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला आदर असल्याचे सांगितले.
जे टीका करतात त्यांना करू द्या, पण समोरून जेव्हा अॅक्श्न होते, तेव्हा आमच्याकडून रिअॅक्श्न दिली जाते एवढेच. माझ्या ३५ वर्षाच्या राजकीय प्रवासात मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज्यभरात फिरलो, त्यांना खूप जवळून मी अनुभवलं आहे. गोरगरीब आणि सामान्यांसाठी त्यांनी काय काय केले? हे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे.
माझ्या सारख्या व्यक्तीला ज्याची शहरात तीन हजार मतंही नाहीत, त्यांनी महापालिकेत सभापती, महापौर, आमदार, खासदार केलं. मातोश्रीकडून जे प्रमे मला व माझ्या सारख्या हजारो शिवसैनिकांना मिळाले, ते मी कधी विसरू शकत नाही. त्यामुळे राज्यात कोण काय टीका करतं माझ्यासाठी महत्वाचे नाही. मी मात्र मातोश्री आणि तिथे राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल कधीच वाईट शब्द काढणार नाही, याचा पुनरुच्चार देखील प्रदीप जैस्वाल यांनी केला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.