Ambadas Danve On Walmik Karad News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Walmik Karad : अंबादास दानवे म्हणतात, वाल्मीक कराडची किती संपत्ती ट्रान्सफर झाली याचा ईडीने तपास करावा!

Ambadas Danve demands an investigation by the Enforcement Directorate (ED) into the transfer of assets of Valmik Karad. : वाल्मीक कराडने खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक दिवस पोलीसांना गुंगारा दिला होता. जेवढे दिवस तो फरार होता, त्याकाळात त्याने आपल्या नावावरची किती संपत्ती ट्रान्सफर केली किंवा झाली याचा तपास होणे गरजेचे आहे.

Jagdish Pansare

Shivsena News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कपंनीच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागीतल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराड याची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आणखी एक मागणी केली आहे.

संपत्ती जप्त करण्याचा निर्णय चांगला आहे, पण वाल्मीक कराड (Walmik Karad) याची किती संपत्ती ट्रान्सफर झाली आहे, याची ईडीने चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. वाल्मीक कराड याच्या अटकेनंतर दररोज त्यांच्या संपत्तीबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. पत्नी आणि स्वतःच्या नावावरील संपत्तीच काही कोटींमध्ये असल्याचे समोर आले आहे. याची व्यापती पाहता त्याची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु वाल्मीक कराड याची मोठ्या प्रमाणत संपत्ती ही त्याच्या नातेवाईक किंवा विश्वासू लोकांच्या नावावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी थेट अशा संपत्तीची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. वाल्मीक कराडच्या स्वतःच्या नावावर किती संपत्ती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

वाल्मीक कराडने खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक दिवस पोलीसांना गुंगारा दिला होता. जेवढे दिवस तो फरार होता, त्याकाळात त्याने आपल्या नावावरची किती संपत्ती ट्रान्सफर केली किंवा झाली याचा तपास होणे गरजेचे आहे. त्यावर कारवाई झाली पाहिजे, सरकार या संपूर्ण प्रकरणात पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

इतर वेळी तत्परतेने कारवाई करणारी ईडी हजारो,कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या वाल्मीक कराडला साधी नोटीसही देत नाही. साधा तपास करत नाही,त्यामुळे या संपूर्ण तपासावर निश्चितपणे संभ्रम असल्याचे दानवे म्हणाले. या प्रकरणात अजूनही एक आरोप फरार आहे,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सीसीटीव्ही व्हिडिओ मीडियाला मिळतात पण पोलिसांना माहित होत नाही? या प्रकरणाचा तपास पोलिस व्यवस्थित करत नाहीत. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धनंजय मुंडेंवरही कारवाई करायला हवी. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता आणि पक्षानेही तो घ्यायला हवा होता, असेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT