Santosh Deshmukh
Santosh DeshmukhSarkarnama

Santosh Deshmukh Case : धक्कादायक! गॅस सिलेंडरचा पाईप, क्लच वायर अन्.., संतोष देशमुखांच्या हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांची माहिती आली समोर

Santosh Deshmukh murder case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाय या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.
Published on

Beed News, 24 Jan : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाय या हत्येप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

अशातच आता एसआयटीच्या तपासात संतोष देशमुखांच्या हत्येबाबत मोठा आणि धक्कादायक पुरावा समोर आला आहे. यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी गुन्हेगारांनी कोणकोणती हत्यारे वापरली होती. याबाबतची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यानुसार, आरोपींनी हत्येसाठी एक 41 इंच लांबीचा गॅस सिलेंडर पाईप, ज्याची एक बाजू गोलाकार केलेली आणि त्यावर काळ्या दोऱ्याने गुंडाळून मुठ तयार केलेली आहे.

याशिवाय एक लोखंडी अर्धा इंच पाईप आणि त्यात लोखंडी तारेचे पाच क्लच वायर वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप सीआयडीला तलवारीसारखे धारधार शस्त्र, चार लोखंडी रॉड, कोयता, फायटर ही हत्यारं अद्याप सापडलेली नाहीत. त्यामुळे ती आरोपींनी नेमकी कुठे टाकली याबाबतचा तपास सुरू आहे.

Santosh Deshmukh
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितली बैलगाडीत झोपलेल्या जिल्हाधिकाऱ्याची गोष्ट

कराडवर आयसीयूमध्ये उपचार

तर देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेला आणि खंडणी प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कराडचे मेडिकल चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ताप, सर्दी, खोकला असल्याचे सांगितले होते. मात्र रात्री जेवणानंतर त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

Santosh Deshmukh
Delhi Election 2025 : महाराष्ट्रानंतर दिल्ली काबीज करण्यासाठी CM योगी मैदानात; राजधानीत 'बटेंगे तो कटेंगे'ची जादू चालणार का?

कृष्णा आंधळे अद्याप फरारच

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे अखेर बीड (Beed) पोलिसांनी बुधवारी त्याला फरार घोषित केलं आहे. पोलिसांनी आंधळेचा महाराष्ट्रासह शेजारील राज्यात देखील शोध सुरू केला आहे. तसंच त्याला अटक करण्यासाठी आवश्यक माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीस देखील जाहीर केलं आहे. मात्र, तरीही अद्याप कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा पोलिसांना समजला नाहीये, त्यामुळे देशमुख कुटुंबियांकडून पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com