औरंगाबाद ः राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेते, मंत्र्याविरुद्ध गेल्या वर्ष-दीड वर्षात ईडीने कारवायांचे सत्र सुरू केले होते. (Shivsena) राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेते, मंत्र्यांच्या मागे हा ससेमिरा लागला होता. (ED) आता यात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचेही नाव समाविष्ट होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
सत्तार यांच्या मतदारसंघातील एका माहिती अधिकारी कार्यकर्त्याने सत्तार यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराचे पुरावे व तक्रार आपण ईडीकडे दिले असल्याचा दावा केला आहे. या तक्रारीनंतरच सत्तार यांनी दोन दिवस दिल्लीचा दौरा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांच्या भेटी घेतल्याचा दावा देखील या कार्यकर्त्याकडून केला जात आहे.
एकूण २२ प्रकरणांचे साडेसाशेहून अधिक पानांचे पुरावे आपण ईडीकडे सादर केल्याचा दावा महेश शंकरपल्ली या माहिती अधिकारी कार्यकर्त्याने केला आहे. कोट्यावधींची बेनामी मालमत्ता जमावल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
शासकीय जमीनीत गैरव्यवहार, आमदार निधीत गैरप्रकार या शिवाय नोटाबंदीच्या काळात सत्तार यांनी अनेक गैरप्रकार केल्याचा दावा देखील शंकरपल्ली यांनी केला आहे. ईडीने या संपुर्ण प्रकरणांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी संबंधिताने ईडीकडे केली आहे.
दरम्यान, ईडीकडे तक्रार दाखल करतांना शंकरपल्ली यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची देखील भेट घेतल्याचे समजते. आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार आपल्यावर झालेल्या आरोपांना काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, महेश शंकरपल्ली यांनी सत्तार यांच्याविरोधात तसेच नगरपरिषदेतील गैरव्यवहाराबाबत देखील अनेकदा जिल्हाधिकारी व संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. ६ प्रकरणांमध्ये चौकशी समित्या स्थापन झाल्या पण प्रत्यक्षात कारवाई मात्र झाली नाही, सत्तार यांच्या दबावामुळेच संबधितांनी कारवाई केली नाही, असा आरोप देखील शंकरपल्ली यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.