बीडमध्ये पुन्हा एकदा काकाचं ठरले अव्वल ; जयदत्त अण्णांनी उधळला गुलाल

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर क्षीरसागर कुटुंबातील काका-पुतण्या अनेक वेळा आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
sandip kshirsagar, jaydatta kshirsagar
sandip kshirsagar, jaydatta kshirsagarsarkarnama
Published on
Updated on

बीड : बीड तालुका दुध संघावर जयदत्त क्षीरसागरांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे बीडच्या सहकार क्षेत्रातील तालुका दुधसंघ निवडणुकीत, पुन्हा एकदा काका पुतण्यावर भारी ठरले आहेत. बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर सदस्यांना जयदत्त क्षीरसागर यांनी पेढे भरवले. दुध संघाच्या विजयामुळे ग्रामीण भागातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची (jaydatta kshirsagar) ताकद वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर (sandip kshirsagar) यांच्या पक्षाला तालुका दुध संघाच्या निवडणुकीत उमेदवार देखील उभा करता आले नाहीत. त्यामुळे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी एकहाती बिनविरोध निवडणूक जिंकली असून दूध संघावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बीड मतदार संघात तालुका दुध संघ ही महत्त्वाची संस्था आहे. .विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर क्षीरसागर कुटुंबातील काका-पुतण्या अनेक वेळा आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ''दूध संघाच्या स्थापनेपासून लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवलाय, दुधावर प्रक्रिया करत ग्रामीण भागातील दूध उत्पादकांचा फायदा होईल, या अनुषंगाने काम करत आहोत,''

sandip kshirsagar, jaydatta kshirsagar
ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीलाही लाजविणारे ; गिरीश महाजनांचा हल्लाबोल

या निवडणुकीनंतर आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकांमध्ये काका-पुतण्या भारी ठरणार का? हे देखील पाहणं तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com