Arjun Khotkar News : Atul Save Sarkarnama
मराठवाडा

Arjun Khotkar On Atul Save : निधी वाटपावरून शिंदे गट-भाजपमध्ये बाचाबाची; अर्जुन खोतकर मंत्री सावेंवर गरजले!

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar News : निधी वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच झालेला वाद ताजा असतानाच जालन्यातही निधी वाटपावरून भाजप व शिवसेना शिंदे गटात चांगलाच राडा झाला. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी हे जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. (Latest Marathi News)

विकास निधी देताना दुजाभाव होत असून, याची नोंद कागदोपत्री आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर दिली जाणार असल्याचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.

जालन्यातील वादानंतर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते आमदार अर्जुन खोतकर म्हणाले, "शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी पालकमंत्री सावे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. असे व्हायला नको होते, मात्र झाले. जे घडलं त्याचं समर्थन मी करत नसलो, तरीही सभ्यतेची भाषा पालकमंत्री यांनी ओलांडली आहे. त्यामुळेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सावे यांना असा अपमान करण्याचा काही अधिकार नाही. सावे सातत्याने अपमान करण्याचा प्रयत्न करतात. आमचे पदाधिकारी त्यांचे हक्क मागण्यासाठी गेले होते, पण सावे यांचे असे वागणे बरे नव्हे."

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे याप्रकरणी मुद्दा मांडणार आहोत. विकास निधी देताना दुजाभाव होत असून, याची नोंद कागदोपत्री आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिली जाणार असल्याचे देखील अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात विकास निधीच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT