PM  Modi big statement in the meeting of nda
PM Modi big statement in the meeting of ndaSarkarnama

PM Modi Big Statement : ठाकरेंनी युती तोडली, आम्ही नाही," ; NDA च्या बैठकीत मोदींचा पलटवार

NDA Alliance News : भाजप अहंकारी नाही.
Published on

New Delhi : सत्तेचं समसमान वाटप आणि मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादामुळे २०१९च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची तीस वर्षांपासूनची युती तुटली. युती कुणामुळे तुटली, त्याला कोण जबाबदार यावर नेहमीच चर्चा होत असते. "ठाकरेंनी युती तोडली, आम्ही तोडली नाही," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. एनडीएच्या बैठकीनंतर ते बोलत होते. मोदींनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

PM  Modi big statement in the meeting of nda
Jalgaon Municipal Corporation: 'त्या' २७ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; सुनावणी पुढे ढकलली

एनडीएच्या खासदारांची बैठक मंगळवारी नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मेघवाल आणि जे पी नड्डा उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या अहंकारी उदाहरणांचा दाखला बैठकीत दिला. यापुढेही एनडीए म्हणून कायम एकत्र राहण्याचे आवाहन मोदींनी केले.

पवारांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही..

"काँग्रेस प्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही. स्वार्थासाठी काँग्रेसने अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही," असे मोदींनी नमूद केले.

PM  Modi big statement in the meeting of nda
Ashish Shelar On Nana Patole: नाना, मुख्यमंत्री होण्याआधी आमदार व्हा ; शेलारांनी पटोलेंना काढला चिमटा..

या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील?

शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत असते. यावर मोदी म्हणाले, "तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यवर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले,"

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com