DCM Eknath Shinde Attack On Uddhav Thackeray News Parbhani Sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde News : फुकटचा टाटा अन् नाव 'उबाठा', एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंची खिल्ली!

Eknath Shinde Attack On Shivsena UBT : दिल्लीतील स्फोटामुळे संपूर्ण देश चिंतेत आहे, पण विरोधकांना त्यातही राजकारण करायचे आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

Jagdish Pansare

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर थेट टीका करत “आम्हाला दगाबाज म्हणणारेच खरे दगाबाज आहेत” असे वक्तव्य केले.

  2. उद्धव ठाकरेंनी अलीकडेच शिंदे गटावर “विश्वासघात” केल्याचा आरोप केला होता, त्यावरून हा पलटवार झाला.

  3. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना गटांतील तणाव पुन्हा वाढला असून राजकीय वातावरण तापले आहे.

Shivsena Rally In Parbhnai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख हे नुकतेच मराठवाड्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी येऊन गेले. याचाच धागा पकडत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिदें यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. राज्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी सध्या बिनकामाचे लोक फिरत आहेत. हेच लोक परभणीतही आले होते.

माझ्याकडे देण्यासाठी काही नाही म्हणणारे हे केवळ फुकटचा टाटा आणि नाव उबाठा असणारे लोक आहेत. ज्यांनी राज्याचे वातावरण दुषित केले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केला. नगरपरिषद, नगरप पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पहिलाच मराठवाडा दौरा होता. परभणीच्या महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सभेत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

दिल्लीतील स्फोटामुळे संपूर्ण देश चिंतेत आहे, पण विरोधकांना त्यातही राजकारण करायचे आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना महायुती सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिवस-रात्र झटत आहे. आम्ही 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असून, कर्जमाफीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. याच पार्श्वभूमीवर त्यांनी दगाबाज रे अभियान राबवणाऱ्या उद्धव ठाकरेंवर थेट पलटवार केला.

विरोधक आम्हाला दगाबाज म्हणतात, पण खरे दगाबाज तेच आहेत. ज्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, प्रकल्प बंद पाडले, योजनांना खो घातला. त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला, कारण जनतेचा विश्वासघात आम्हाला सहन नव्हता, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ओठावर भवानी आणि पोटात बेईमानी असणाऱ्यांनीच राज्य दुषित केले आहे. हे लोक जनतेत गोंधळ निर्माण करण्याचे काम करत आहेत. पण आता जनता सर्व पाहते आणि ओळखते. राज्यात विरोधकांची जुनी ढोलकी आता फाटली आहे, आणि जनता फसवणाऱ्यांना आता माफ करणार नाही असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी परभणी शहर व जिल्ह्यातील विकास कामांची मागणी केली. त्याला एकनाथ शिंदे यांनी हे काम पूर्ण करणार असल्याचे सांगत आश्वासन दिले. एकनाथ शिंदे आज मराठवाड्यातील परभणी आणि जालना दौऱ्यावर आहेत. परभणीत सभा घेतल्यानंतर सायंकाळी शिंदे हे जालन्यात असणार आहे. तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांचा पक्षप्रेवश होणार आहे. आमदार अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने हा प्रवेश होत आहे.

गाडी भरकटली..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण झाल्यानंतर त्यांना पोलिस मुख्यालयाकडे जायचे होते. परंतू त्यांची एकट्याचेच वाहन विरुध्द दिशेने पुढे निघून गेले. त्यामुळे पोलिस, अधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. पुन्हा शिंदे यांचे वाहन ताफ्यात घेवून हेलीपॅडकडे रवाना झाले.

FAQs

1. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर काय वक्तव्य केले?
→ त्यांनी म्हटले की “आम्हाला दगाबाज म्हणणारेच खरे दगाबाज आहेत,” असा पलटवार केला.

2. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर काय आरोप केले होते?
→ उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर विश्वासघात आणि पक्षफुटीचा आरोप केला होता.

3. या वक्तव्यामुळे काय परिणाम झाले?
→ दोन्ही गटांतील वाद अधिक चिघळले आणि महाराष्ट्रात राजकीय वातावरण पुन्हा तापले.

4. शिंदेंचे वक्तव्य कुठे झाले?
→ परभणी येथील सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट लक्ष्य केले.

5. याचा पुढील राजकीय समीकरणांवर कसा परिणाम होऊ शकतो?
→ शिंदे आणि उद्धव गटातील दरी आणखी वाढेल, तसेच आगामी निवडणुकांवर त्याचा परिणाम दिसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT