Maharashtra Assembly Election 2024 : ज्यांच्यासमोर सुनावणी झाली ते सरन्यायाधीश देखील निवृत्त झाले. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता मी जनतेच्या न्यायालयापुढे जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं न्यायालय हे जनतेचं आहे.
आणि ते न्यायालय आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जालना जिल्ह्यातील परतूर येथील प्रचारसभेत केलं आहे. या सभेतून त्यांनी भाजप आणि शिंदेसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
तसंच देशाचे सरन्यायाधीश निवृत्त झाले तरी आम्हाला अद्याप न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "सरन्यायाधीश निवृत्त झाले, आम्हाला न्याय मिळणार आहे का नाही? लोकशाही अखेरची घटका मोजत आहे. तिला वाचवणारं कुणी आहे का? सगळीकडे फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे.
मधल्या काळात न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. ही सगळी थट्टा तुम्ही कशासाठी करत आहात. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी तुमच्यावर ताशेरे ओढले आहेत. संविधानाप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तीन सरन्यायाधीश झाले तरीदेखील लोकशाहीला अजून न्याय नाही मिळत नाही.
पण आमचं सगळ्यात महत्त्वाचं न्यायालय म्हणजे जनता आहे आणि जनता आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. माझा पक्ष आणि चिन्ह पळवलं. जर कोणी माझ्या शिवसेनेला नकली सेना म्हणत असेल तर तो बेअकली आहेत.
पक्ष चोरला, चिन्हं चोरलं. भाडखाऊ पेक्षा जास्त वेगळा शब्द वापरायला पाहिजे. मिंध्याना स्वतःच्या बापाचं नाव वापरायला लाज वाटते. मी काढलेला फोटो तुम्ही चोरला. हमखास पराभवाची गॅरंटी म्हणजे यांची गॅरंटी. " अशा शब्दात त्यांनी भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला.
भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (DY Chandrachud) हे 10 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. मात्र, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णयावर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा अंतिम निकाल कधी येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.