Ajit Pawar Meets Prakash Ambedkar : अजितदादा मोठा डाव टाकणार, प्रकाश आंबेडकरांची घरी जाऊन भेट; 'हे' आहे राजकारण

NCP Ajit Pawar And Vanchit Bahujan Aaghadi : अजितदादा पवार यांनी गुरुवारी घेतलेली अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. अँजिओप्लास्टी झालेल्या आंबेडकरांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट होती, असे अजितदादांनी सांगितले आहे.
Ajit Pawar meets Prakash Ambedkar .jpg
Ajit Pawar meets Prakash Ambedkar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीत अजितदादा पवार काहीसे बाजूला पडले होते. अजितदादांच्या प्रवेशामुळेच महायुतीची पीछेहाट झाली, असे भाजपचे नेते उघडपणे बोलू लागले होते. अजितदादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, अशा आशयाचा लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाला होता.

त्यातच लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून उमेदवार दिला नव्हता.आता विधानसभेला मात्र वंचितने उमेदवार दिला आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार (Ajit Pawar) आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या गेल्या आठवड्यात पुण्यात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या ते पुणे येथील घरात आहेत. विविध राजकीय नेत्यांची त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. अजितदादा पवार हे गुरुवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. आंबेडकर यांच्या शिवाजीनगर येथील घरी जाऊन अजितदादांनी त्यांची भेट घेतली. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आंबेडकरांची भेट घेतली, असे अजितदादांनी सांगितले आहे.

Ajit Pawar meets Prakash Ambedkar .jpg
Supriya Sule On Sunil Tingre : पुण्यात राजकारण पेटलं, 'पोर्शेकार' अपघातप्रकरणी टिंगरेंनी पाठवली शरद पवारांना नोटीस; सुळेंचा हल्लाबोल

हे कारण खरे असले तरी, या एकाच कारणासाठी त्यांनी भेट घेतली असेल का, असाही प्रश्न आहेत. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीतून मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे. अजितदादांनी आंबेडकरांची भेट घेतली, यामागे हाही संदर्भ असू शकतो.

लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर अजितदादा महायुतीत अडचणीत आले होते. नेमक्या त्याचवेळेच्या आसपास अजितदादा आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र येणार, अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार, अशी चर्चा सुरू झाली होती. कालांतराने ती चर्चा हवेत विरली.

बारामती लोकसभा मतदारसंघाच सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई पवार अशी लढत झाली. त्यात सुनेत्राताई यांचा पराभव झाला. या निवडणुकीत वंचितने बारामती मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता. बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादा पवार यांच्यासमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजितदादा पवार एकत्र येणार, अशीही चर्चा सुरू झालेली आहे. आमच्यात फक्त राजकीय मतभेद आहेत, असे पवार कुटुंबीयांकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. ही चर्चा ताजी असतानाच अजितदादा आणि आंबेडकरांच्या भेटीबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

Ajit Pawar meets Prakash Ambedkar .jpg
Shikhar Bank Scam Video : शिखर बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयात धाव, आर्थिक गुन्हे शाखेनी केली मोठी मागणी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत अजितदादांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. बारामती मतदारसंघातून शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करून अजितदादांना मानसिक त्रास दिला होता. राजकारणात हिशेब चुकते केले जातात, प्रतीक्षा असते ती फक्त योग्य वेळेची.

भाजपने विधान परिषदेवर पाठवलेले सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर मर्यादा सोडून टीका केली आहे. त्यामुळे खोत यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठवली आहे. अजितदादांनीही फोन करून खोत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. खोत यांनी हे वक्तव्य केले त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावरच होते. मात्र, त्यांनी खोत यांना रोखले नाही किंवा नंतरही त्यांचे कान टोचले नाहीत.

Ajit Pawar meets Prakash Ambedkar .jpg
Vanchit Bahujan Aaghadi : 'वंचित'च्या 'या' निर्णयामुळे भाजपला दिलासा अन् काँग्रेसचं वाढणार टेन्शन?

वंचित आघाडीच्या किंवा कोणत्याही किती जागा निवडून येतील, हे निश्चित सांगता येत नाही, केवळ अंदाज बांधता येतो. निवडणुकीनंतर काय होईल, हेही सांगता येत नाही. शरद पवार आणि अजितदादा एकत्र येणार, याही केवळ चर्चा आहेत. त्यामुळे अजितदादा आणि आंबेडकर यांच्या भेटीवरून काही ठोस निष्कर्ष काढणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे ठरणार आहे. असे असले तरी मित्रपक्षांवर दबाव टाकण्यासाठी, काही हिशेब चुकते करण्यासाठी राजकीय नेते योग्य वेळेची प्रतीक्षा करत असतात.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांनीही तसे केले असेल का किंवा विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून वंचितने उमेदवार दिल्याचा संदर्भ या भेटीमागे असेल, यावर खल सुरू झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com