Central State Minister Dr.Bhagwat Karad News, Aurangabad
Central State Minister Dr.Bhagwat Karad News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Dr.Bhagwat Karad News : लोकसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबादेत भाजपकडून मोठ्या प्रकल्पांचा गाजावाजा

सरकारनामा ब्युरो

Aurangabad News: येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कोण लढणार यावर भाजप (Bjp) आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरू आहे. असे असले तरी भाजपने या मतदारसंघावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे.

भाजपची ही तयारी पाहता आणि दावा सांगितलेला असताना शिंदे गटाने पाळलेले मौन यावरून तरी औरंगाबादची (Aurangabad) जागा भाजपच लढवणार असे संकेत मिळत आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासंदर्भात माहिती दिली.

त्यानुसार शहरात मेट्रो आणि केंब्रिज चौक ते वाळूज अशा एकाच अखंड पुलाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी साडेसहा हजार कोटी खर्च येणार आहे. यासाठीचा आराखडा तयार असून तो लवकरच केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

तसेच औरंगाबाद येथून प्रादेशिक विमानसेवा वाढवण्यासाठी बंगरूळ, अहमदाबाद, नागपूर, चेन्नई, उदयपूर आणि गोवा या मार्गासंदर्भात दिल्लीत विमान कंपन्यासोबत बोलणी झाल्याचे कराड यांनी स्पष्ट केले. याशिवाय केंद्रातील बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळाले या विरोधकांच्या टीकेला देखील कराड यांनी आकडेवारी देत प्रत्युत्तर दिले.

महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी पहिल्यांदाच बजेटमधून १३ हजार कोटी रुपये मिळाल्याचे आणि त्यातून मराठवाड्याच्या वाट्याला किती आले हे ही कराड यांनी स्पष्ट केले. आता मंत्री म्हणून त्यातील किती निधी हा आम्ही आपापल्या भागांसाठी आणतो ती जबाबदारी आमची असल्याचे कराड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT