Aurangabad Polictical News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसेवेसाठी कधीच कुटुंब सोडले आहे. मतदानासाठीचा पत्ता त्यांचा गुजरातमधला असल्यामुळे तरी किमान त्यांची कुटुंबाशी भेट होते. Narendra Modi मोदींनी स्वतःचे जीवन हे राष्ट्रसेवेसाठी वाहून घेतले आहे, ते कुटुंबात कधीच राजकारण आणत नाहीत. आज ते ज्या पदावर आहेत, ते स्वकर्तृत्वावर त्यांनी मिळवले आहे, असे गौरवोद्दगार पंतप्रधानांचे लहान बंधू प्रल्हाद मोदी यांनी काढले.
आॅल इंडिया फेअर प्राईज डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष असलेले प्रल्हादभाई मोदी हे बुलडाणा येथील अधिवेशनाला उपस्थितीत राहण्यासाठी ( Aurangabad) औरंगाबादेत आले होते. (Marathwada) यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी मोदी यांच्याविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला. मोदी कुटुंबात कधीच राजकारण आणत नाहीत, आणि व्यवहारात त्यांच्या कुटुंब कधीच नसते. अन्यथा आज मी अंबानींचा पार्टनर झालो असतो.
आमच्या घराण्यात राजकारण नव्हते, आम्हाला तसा वारसा देखील नाही. आमचं कुटुंब हे एका सिध्दांतावर चालत म्हणून भाऊ पंतप्रधान असला तरी आम्ही सगळे सामान्य जीवन जगतो. मोदी देशसेवेतून जनकल्याणाची कामे करत आहेत, तर मी स्वस्त धान्य दुकांनामधून गरिबांना धान्य कसे मिळेल यासाठी काम करतो.
मोदींशी भेटीचा योग कधी तरी येतो. निवडणुकीत मतदानाचा पत्ता गुजरातचा असल्यामुळे तरी ते कुटंबाकडे येतात नाहीतर, राष्ट्रसेवेसाठी त्यांनी कुटुंब केव्हाच सोडले असल्याचेही प्रल्हाद मोदी यांनी सांगितले. गुजरातच्या एक पदयात्रे स्वागतासाठी मी हार घेऊन गर्दीत उभा होतो, तेव्हा त्यांनी मला जवळ बोलावून सत्कार स्वीकारल्याची आठवण देखील प्रल्हाद मोदी यांनी यावेळी सांगितली.
मोदी गुजरातमध्ये अहमदाबादेत गेले की आपल्या आईला आवर्जून भेटतात, त्यांच्या हातचे जेवण करतात. या संदर्भात सोशल मिडियावर अनेक छायाचित्रे, व्हिडिओ देखील पहायला मिळतात. देशाच्या सर्वोच्च पदावर असतांना देखील त्यांचे कुटुंब अगदी सामान्य जीवन जगत आहे. याची देखील अधूनमधून चर्चा होत असते. प्रल्हाद मोदी यांनी देखील या निमित्ताने तेच दाखवून दिले. पंतप्रधानांचे लहान भाऊ असून देखील त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा किंवा बंदोबस्त नव्हता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.